शाओमी इंडियाने आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्सवरून Mi Smarter Living 2022 इव्हेंटची घोषणा केली आहे. हा इव्हेंट 26 ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून Xiaomi अनेक प्रोडक्टस भारतात सादर करू शकते. यात नवीन IoT प्रोडक्टसचा समावेश असेल. अलीकडेच Xiaomi ने बॅकलिट कीबोर्ड असलेला नवीन Mi Notebook टीज केला होता, तसेच Mi Band 6 आणि इतर प्रोडक्ट या दिवशी भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात. Xiaomi ने सांगितले आहे कि, Mi Smarter Living 2022 इव्हेंट 26 ऑगस्टला 12 वाजता सुरु होईल.
Mi Notebook
Xiaomi चे चीफ बिजनेस ऑफिसर रघु रेड्डी यांनी India Today ला सांगितले आहे कि कंपनी लवकरच बॅकलिट की-बोर्डसह Mi Notebook लाँच करणार आहे. नवीन Mi Notebook चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स समोर आले नाहीत. परंतु सध्या उपलब्ध असलेली मी नोटबुक लाईन बंद करून नवीन लॅपटॉप सीरिज सादर केली जाईल.
Mi Band 6
काही रिपोर्ट्सनुसार, Mi Smarter Living 2022 इव्हेंटच्या माध्यमातून 26 ऑगस्टला Mi Band 6 बॅंड देखील भारतात सादर केला जाऊ शकतो. या फिटनेस बँडमध्ये 1.56-इंचाचा AMOLED डिस्प्ले, SpO2 सेन्सर, 30 एक्सरसाइज मोड आणि 14 दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल. Mi Band 6 कंपनीने चीनमध्ये 229 CNY (अंदाजे 2,500 रुपये) मध्ये सादर केला आहे.
Mi TV
Mi Smarter Living 2022 चे ट्विट Mi TV India च्या अकॉउंटने देखील रिट्विट केले आहे. त्यामुळे कंपनीने या इव्हेंटच्या माध्यमातून आपला स्मार्ट टीव्ही पोर्टफोलियो वाढवू शकते, अशी चर्चा आहे. शाओमीने समथिंग बिग इज कमिंग असे म्हटल्यामुळे मोठ्या स्क्रीन साईजची स्मार्ट टीव्ही बाजारात येण्याची अपेक्षा आहे.