शाओमी इंडिया सध्या Mi Smarter Living 2022 इव्हेंटची तयारी करत आहे. हा इव्हेंट 26 ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून Xiaomi अनेक प्रोडक्टस भारतात सादर करू शकते. यात Mi TV 5X स्मार्ट टीव्हीचा देखील समावेश करण्यात येईल. कंपनीने आपल्या ऑफिशियल वेबसाइटवर स्मार्ट टीव्हीसाठी माइक्रोसाइट बनवली आहे. या प्रॉडक्ट पेजवरून Mi TV 5X स्मार्ट टीव्हीची माहिती मिळाली आहे.
Mi TV 5X
26 ऑगस्टला होणाऱ्या Mi Smarter Living 2022 इव्हेंटमधून Xiaomi Mi TV 5X स्मार्ट टीव्ही भारतीयांच्या भेटीला येईल. Xiaomi Mi TV 5X स्मार्ट टीव्ही स्लिम बेजल्स आणि मेटॅलिक फिनिशसह सादर करण्यात येईल. हा स्मार्ट टीव्ही ब्राइट आणि फाइन ट्यून व्हिज्युअल आणि डॉल्बी पावर स्पिकरसह सादर करण्यात येईल. गुगल असिस्टंट सपोर्टसह यात नेक्स्ट जेनेरेशन PatchWall UI देण्यात येईल.
Mi Smarter Living 2022 मध्ये लाँच होणारे प्रोडक्ट
Mi Notebook
Xiaomi लवकरच बॅकलिट की-बोर्डसह Mi Notebook लाँच करणार आहे. नवीन Mi Notebook चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स समोर आले नाहीत. परंतु सध्या उपलब्ध असलेली मी नोटबुक लाईन बंद करून नवीन लॅपटॉप सीरिज सादर केली जाईल.
Mi Band 6
काही रिपोर्ट्सनुसार, Mi Smarter Living 2022 इव्हेंटच्या माध्यमातून 26 ऑगस्टला Mi Band 6 बॅंड देखील भारतात सादर केला जाऊ शकतो. या फिटनेस बँडमध्ये 1.56-इंचाचा AMOLED डिस्प्ले, SpO2 सेन्सर, 30 एक्सरसाइज मोड आणि 14 दिवसांची बॅटरी लाइफ मिळेल. Mi Band 6 कंपनीने चीनमध्ये 229 CNY (अंदाजे 2,500 रुपये) मध्ये सादर केला आहे.