शाओमीने Mijia Washing Machine Mini चीनमध्ये सादर केली आहे. ही एक कॉम्पॅक्ट आणि पोर्टबल वॉशिंग मशीन आहे. तसेच कंपनीने सादर केलेली आतापर्यंतची सर्वात छोटी वॉशिंग मशीन आहे. घरापासून दूर राहणाऱ्या आणि एकट्याने राहणाऱ्या तरुण-तरुणांसाठी कंपनीने या मशीनची निर्मिती केली आहे, तसेच लहान मुलांच्या कपड्यांसाठी देखील हा योग्य पर्याय ठरू शकतो.
Mijia Washing Machine Mini ची किंमत
Mijia Washing Machine Mini चीनमध्ये 1,099 चीनी युआन (सुमारे 12,600 रुपये) मध्ये सादर करण्यात आली आहे. 1ऑक्टोबरला सकाळी 10 वाजल्यापासून Xiaomi Mall, Xiaomi Youpin, JD.com, Tmall इत्यादी ऑनलाईन पोर्टल्सवरून विकत घेता येईल. ही मशीन कंपनी भारतात सादर करणार आहे कि नाही याची माहिती मात्र मिळाली नाही.
Mijia Washing Machine Mini ची वैशिष्ट्ये
Mijia Washing Machine Mini ची सर्वात मोठी खासियत म्हणजे यातील हाय टेम्परेचर बॉईल बॉइल-वॉश फिचर आहे. या मोडमध्ये जिवाणूंचा नाश करण्यासाठी 90 डिग्री सेल्सियस, डाग घालवण्यासाठी 40 डिग्री सेल्सियस, रूम टेम्परेचर आणि 60 डिग्री सेल्सियस असे चार लेव्हल देण्यात आल्या आहेत. म्हणून ही मशीन नवजात बाळांचे कपडे धुण्यासाठी योग्य ठरू शकते, असे कंपनीने म्हटले आहे.
मशीनची लोडिंग क्षमता मात्र फक्त 1 किलोग्राम आहे. यात 16 खास वॉशिंग मोड्स देण्यात आले आहेत, ज्यात 10 स्टेन वॉश प्रोसेसचा समावेश आहे. ही स्मार्ट वाशिंग मशीन मोबाईलला कनेक्ट करून एका अॅपच्या माध्यमातून कंट्रोल देखील करता येते.