Xiaomi ने लहान मुलांसाठी MITU Children's Learning Watch 5X स्मार्टवॉच लाँच केला आहे. हा वॉच लहान खासकरून लहान मुलांसाठी डिजाईन करण्यात आला आहे. यात सुरक्षा फीचर्सवर भर देण्यात आला आहे. 2ATM वॉटर रेजिस्टन्ससह येणाऱ्या या स्मार्टवॉचमध्ये ड्युअल एचडी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा शाओमी स्मार्टवॉच सध्या चीनमध्ये पिंक आणि ब्लू अश्या दोन रंगात लाँच करण्यात आला आहे. (MITU Children’s Learning Watch 5X launched in china)
MITU Children's Learning Watch 5X चे स्पेसिफिकेशन्स
MITU Children's Learning Watch 5X स्मार्टवॉच मध्ये 1.52 इंचाचा रेटिना डिस्प्ले 360x 400 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 355पीपीआय पिक्सल डेन्सिटीला सपोर्ट करतो. वॉचमधील कॉर्निंग गोरिल्ला 3 प्रोटेक्शनसह येणार हा वॉच स्क्रॅच रेजिस्टन्स आहे.
या वॉचमध्ये ड्युअल कॅमेरा सपोर्ट मिळतो, यात 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा साइड कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा व्हिडीओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे, तर साइड कॅमेरा पालकांना मुलांच्या आजूबाजूच्या परिसराची माहिती मिळावी म्हणून देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमधील 900mAh ची बॅटरी 6 दिवसांचा स्टॅन्डबाय टाइम देते. नियमित वापर केल्यास हा वॉच 3 ते 4 दिवस वापरता येईल.
MITU Children's Learning Watch 5X ची किंमत
MITU Children's Learning Watch 5X स्मार्टवॉच चीनमध्ये 579 युआन (जवळपास 6,618 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे. चीनमध्ये हा वॉच Youpin वेबसाइटच्या माध्यमातून विकत घेता येईल.