डिसेंबर 2021 मध्ये भारतीय इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने परदेशी स्मार्टफोन कंपन्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या होत्या. आता डिपार्टमेंटनं दिलेली माहिती Xiaomi आणि Oppo च्या अडचणीत वाढ करणारी आहे. आयकर विभागानुसार, या दोन्ही स्मार्टफोन कंपन्यांनी इन्कम टॅक्स कायद्याचं उल्लंघन केलं आहे, त्यामुळे त्यांना 1,000 कोटी रुपयांचा दंड द्यावा लागू शकतो.
या दोन्ही बड्या टेक कंपन्यांनी आपलं टॅक्सेबल प्रॉफिट 1,400 कोटी रुपयांनी कमी करण्यासाठी खर्च वाढवल्याचं दाखवलं आहे. आयकर विभागनं या कंपन्यांची नावं सांगितली नाहीत. परंतु TOI च्या रिपोर्टनुसार, या दोन कंपन्या म्हणजे चीनी स्मार्टफोन ब्रँड Oppo आणि Xiaomi आहेत.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनुसार, या कंपन्यांनी परदेशातील आपल्या पॅरेंट कम्पन्यानं 5,500 कोटींपेक्षा जास्त रॉयल्टी पाठवली आहे. तसेच स्मार्टफोनच्या कंपोनंट्सच्या खरेदीमध्ये देखील गडबड असल्याचं डिपार्टमेंटच्या तपासात सापडलं आहे. इन्कम टॅक्स अॅक्टनुसार दंडात्मक कारवाई केल्यास या कंपन्यांना 1000 कोटी रुपये दंड भरावा लागू शकतो.
IT डिपार्टमेंटनं 11 राज्यांतील परदेशी स्मार्टफोन कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. यात तामिळनाडु, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि अन्य काही राज्यांचा समावेश होता. या सर्व बातमीवर शाओमी किंवा ओप्पोकडून कोणतंही विधान समोर आलं नाही.
हे देखील वाचा:
OMG! फक्त 7.5 हजारांत दमदार LED TV; नवीन वर्षात Flipkart देतंय बंपर डिस्काउंट
शरीराचं तापमान सांगणारा Smartwatch; Omicron विरोधात ठरू शकतो उपयुक्त, किंमत 2 हजारांच्या आत