Xiaomi ने काल झालेल्या आपल्या इव्हेंटच्या माध्यमातून इतर डिवाइससह Xiaomi Pad 5 देखील जागतिक बाजारात सादर केला आहे. कंपनीने तीन वर्षानंतर टॅबलेट सेगमेंटमध्ये पुनरागमन केले आहे. या टॅबलेटमध्ये Xiaomi Smart Pen चा सपोर्ट देण्यात आला आहे.
Xiaomi Pad 5 ची किंमत
Xiaomi Pad 5 चे दोन व्हेरिएंट जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. यातील 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत EUR 349 (जवळपास 30,300 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर टॅबलेटचा 6GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट EUR 399 (जवळपास 34,600 रुपये) मध्ये विकत घेता येईल. कंपनी भारतात हा टॅबलेट लवकरच सादर करू शकते.
Xiaomi Pad 5 चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Pad 5 मध्ये 11 इंचाचा WQHD+ ट्रूटोन डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रश रेट 1600 X 2560 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी यात कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसरचा वापर केला आहे. यात 6GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इनबिल्ट स्टोरेज मिळते.
या टॅबलेटमध्ये एलईडी फ्लॅशसह 13MP चा रियर कॅमेरा मिळतो. यातील फ्रंट कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 8MP आहे. Xiaomi Pad 5 मध्ये 8,720mAh ची मोठी बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते. जी 10 तास गेमिंग 16 तास व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकते. कनेक्टिविटीसाठी यात Bluetooth 5, Wi-Fi आणि USB Type C पोर्ट मिळतो.