शाओमीने अलीकडेच सादर केलेल्या पोको एफ १ या स्मार्टफोनला जोरदार रिस्पॉन्स मिळाला असून याचा फ्लॅश सेल हा ५ सप्टेंबर रोजी होणार आहे. शाओमीची उपकंपनी असणार्या पोकोने पोको एफ १ हे मॉडेल अलीकडेच लाँच केले आहे. याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. या स्मार्टफोनचा पुढील सेल आता ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मी.कॉम आणि फ्लिपकार्ट या पोर्टलवर होणार आहे.
पोको एफ १ हे मॉडेल ६ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज; ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोअरेज अशा तीन व्हेरियंटमध्ये अनुक्रमे २०,९९९; २३,९९९ आणि २८,९९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आला आहे. यासोबत काही ऑफर्सदेखील देण्यात आल्या आहेत. एचडीएफसी कार्डवरून खरेदी करणार्याला एक हजार रूपयांचा लाभ मिळणार आहे. रिलायन्स जिओने या ग्राहकाला ६ टिबी डाटा देण्याचे जाहीर केले आहे. यासोबत रिलायन्सची २२०० रूपयांची कॅशबॅक ऑफरदेखील देण्यात आली आहे. तर मेक माय ट्रिपनेही हे मॉडेल खरेदी करणार्यांना आपल्या बुकींगमध्ये सवलत देण्याचे जाहीर केले आहे.
पोको एफ १ या मॉडेलमध्ये ६.१ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले असून यावर २.५ डी वक्राकार ग्लास व कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण दिलेले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ हा अद्ययावत प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याच्या तिन्ही व्हेरियंटमध्ये स्टोअरेज वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. याच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा हा २० मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. यामध्ये ब्युटिफाय फिचर दिलेले आहे. यामध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ८.१ ओरियो आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या मीयुआय ९.६ या प्रणालीवर चालणारा आहे.