Xiaomi नं आपल्या बजेट Redmi ब्रँड अंतर्गत एक नवीन लो बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. Redmi 10 2022 स्मार्टफोनची एंट्री 90Hz Display, 50MP Quad Camera, 4GB RAM, Helio G88 chipset आणि 5,000mAh Battery सह झाली आहे. कंपनीनं या फोनची किंमत मात्र अजूनही सांगितलेली नाही. परंतु लवकरच या हँडसेटच्या किंमतीची आणि भारतीय लाँच माहिती मिळेल.
Redmi 10 2022 चे स्पेसिफिकेशन्स
Redmi 10 2022 स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचाच डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ट मीयुआय 12.5 वर चालतो. यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा हीलियो जी88 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.
रेडमी 10 2022 स्मार्टफोन बाजारात 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह आला आहे. पंच होल डिजाईनसह यात 90हर्ट्ज रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या डिप्सलेला गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. Redmi 10 2022 बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह बाजारात आला आहे. सोबत एनएफसी, आयआर ब्लास्टर व साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हे देखील वाचा: