Xiaomi आपले स्वस्त स्मार्टफोन्स रेडमी ब्रँड अंतगर्त लाँच करते. आता कंपनी रेडमी 9 च्या अपग्रेड व्हर्जन म्हणजे Redmi 10 वर काम करत आहे. ही सिरीज बाजारात कधी दाखल होईल, याची माहिती कंपनीने दिली नाही. परंतु लीक्स आणि सर्टिफिकेशन्समधून Redmi 10 स्मार्टफोन समोर आला आहे. आता Redmi 10 स्मार्टफोन Indonesia Telecom certification वर लिस्ट झाला आहे.
Redmi 10 स्मार्टफोन इंडोनेशिया टेलीकॉम सर्टिफिकेशन्स साइटवर या आठवड्यात लिस्ट करण्यात आला आहे. या वेबसाइटवर हा फोन 21061119AG मॉडेल नंबरसह सर्टिफाइड केला गेला आहे. हाच मॉडेल नंबर एफसीसीवर देखील दिसला होता. नवीन लिस्टिंगमधून रेडमी 10 च्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही, परंतु यावरून हा फोन लाँचसाठी तयार असल्याचे समजते.
Redmi 10 चे स्पेसिफिकेशन्स
समोर आलेल्या लिक्सनुसार Xiaomi ने Redmi 10 मध्ये अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 12.5 देण्यात येईल, तसेच हा फोन ड्युअल बॅंड वायफाय आणि 4जी एलटीईला सपोर्ट करेल. हा रेडमी फोन तीन व्हेरिएंट्समध्ये बाजारात सादर केला जाऊ शकतो. यात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा समावेश असेल. या फोनच्या लाँचची अचूक माहिती समोर आली परंतु हा फोन ऑगस्टमध्ये लाँच केला जाईल अशी अपेक्षा आहे.