Xiaomi आपल्या रेडमी सीरीजमध्ये Redmi 10A आणि Redmi 10C हे दोन स्मार्टफोन सादर करणार असल्याची माहिती आली होती. कंपनीनं मात्र अजूनही या फोन्सबाबत अधिकृत माहिती दिली नाही. तरीही यातील रेडमी 10सी स्मार्टफोन एका शॉपिंग साईटवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून फोनच्या फोटो, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती मिळाली आहे.
ई-कॉमर्स साईटची घाई
एका नायजेरियन ई-कॉमर्स साईटनं Redmi 10C स्मार्टफोन अधिकृत लाँच पूर्वीच लिस्ट केला आहे. या लिस्टिंगनुसार हा फोन 90,000 Nigerian Naira मध्ये विकला जाईल. ही किंमत 16,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. या लिस्टिंगनंतर शाओमी लवकरच हा फोन अधिकृतपणे लाँच करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतात हा फोन यापेक्षा कमी किंमतीत सादर केला जाईल.
Redmi 10C चे स्पेसिफिकेशन्स
लिस्टिंगनुसार, रेडमी 10सी मध्ये 6.53 इंचाचा एलसीडी डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 आधारित मीयुआयवर चालतो. कंपनीनं यात ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे, परंतु चिपसेटची माहिती मिळाली नाही. सोबत 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
Redmi 10C च्या ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात फ्लॅश लाईटसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.बेसिक कनेक्टव्हिटीसह या फोनमध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सरची सिक्योरिटी मिळाली आहे. पावर बॅकअपसाठी या नवीन रेडमी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Graphite Grey कलरमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
- इलेक्शनचा स्ट्रेसही मॉनिटर करेल 'हे' Smartwatch; कमी किंमतीत Redmi Watch 2 Lite लाँच
- अॅप्पल-सॅमसंग सावधान! OnePlus चा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन येतोय भारतात; या दिवशी होऊ शकतो लाँच
- स्वस्त आणि नवीन iPhone SE (2022) घ्यावा कि त्याच किंमतीत iPhone 12 सीरिजचा मॉडेल निवडावा?