शाओमीच्या स्वस्त स्मार्टफोनची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. कंपनी भारतात आपल्या रेडमी नोट 10 सीरीजमध्ये नवीन Redmi Note 10 Lite स्मार्टफोन सादर करणार आहे, असे सांगण्यात आले होते. आता हा शाओमी फोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट बीआयएसवर लिस्ट झाला आहे. या बातमीमुळे रेडमी नोट 10 लाईटच्या लाँचची शक्यता वाढली आहे.
Redmi Note 10 Lite स्मार्टफोनच्या BIS लिस्टिंगमधून या फोनच्या मॉडेल नंबरची माहिती मिळाली आहे. हा फोन 2109106A11 मॉडेल नंबरसह बाजारात येईल याव्यतिरिक्त या मोबाईलची इतर कोणतीही माहिती या सर्टिफिकेशन साईटवर समोर आली नाही. परंतु रेडमी नोट 10 लाईट भारतात लवकरच भारतीयांच्या भेटीला येईल हे मात्र निश्चित झाले आहे.
Redmi Note 10 Lite चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 10 Lite स्मार्टफोन जुन्या रेडमी नोट 9 प्रोचा रीब्रँडेड व्हर्जन असेल, अशी चर्चा आहे. हे जर खरे ठरले तर या फोनमध्ये 6.67-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. या डिस्प्लेमध्ये 1080x2400 रिजोल्यूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेश्यो मिळू शकतो. या फोनमध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगन 720G ऑक्टा-कोर चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळेल. ही स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड सेन्सर, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलच्या चौथ्या सेन्सर असेल. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. Redmi Note 10 Lite मधील 5,020mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकते.