Redmi Note 10S Price In India: यावर्षी मेमध्ये Xiaomi नं आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत Redmi Note 10S स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. तेच या फोनचा 6GB रॅम देशात उपलब्ध होता. परंतु आता कंपनीनं या फोनची ताकद वाढवली आहे. शाओमीनं Redmi Note 10S चा नवीन व्हेरिएंट 8GB रॅमसह सादर केला आहे. या नव्या व्हेरिएंटमध्ये कंपनीनं 128GB स्टोरेज दिली आहे.
Redmi Note 10S ची किंमत
Redmi Note 10S स्मार्टफोनचा नवा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 18,499 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. हा फोन कंपनीच्या वेबसाईट, ऑफलाईन स्टोर्स आणि अॅमेझॉन इंडियावरून 3 डिसेंबरपासून विकत घेता येईल. या फोनसाठी कंपनीनं लाँच ऑफरची घोषणा केली आहे. त्यामुळे या फोनच्या खरेदीवर ICICI क्रेडिट कार्ड धारकांना 1,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. Redmi Note 10S स्मार्टफोनचा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 14,999 रुपये आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 16,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Redmi Note 10S चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी नोट 10 एसमध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी प्लस एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये हाय रिफ्रेश रेट देण्यात आलेला नाही. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी 95 चिपसेट देण्यात आला आहे. सोबतच या फोनमध्ये 6GB/8GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
रेडमी नोट 10एसमध्ये कॅमेरा सेटअप हा 64 मेगापिक्सल प्रायमरी आणि 8 मेगापिक्सल सेकंडरी असा आहे. याला अल्ट्रा वाईड अँगल आहे. सोबतच अन्य कॅमेरे हे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. रिअर कॅमेराने 4K 30fps व्हिडीओ रेकॉर्ड करता येतात. या फोनला 13 मेगा पिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. Redmi note 10S मध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 33 वॉटचा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.