गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत रेडमी नोट 11 प्रो सीरीज चीनमध्ये सादर करण्यात आली आहे. तेव्हपासून या सीरिजच्या भारतीय लाँचचे लिक्स येत आहेत. आता शाओमीनं Note Pro Series च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. या सीरीजमध्ये येत्या 9 मार्चला Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus 5G Phone लाँच केले जातील.
येत्या 9 मार्चला दुपारी 12 वाजता एक इव्हेंट भारतात होणार आहे. या इव्हेंटमधून Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus 5G फोन बाजारात येईल. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण शाओमीच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बघता येईल. चीनमधील लाँचमुळे या हँडसेटच्या स्पेक्सची माहिती मिळाली आहे. कंपनीनं देखील 67W Charging, 108MP Camera आणि 120Hz Display, हे स्पेक्स टीज केले आहेत.
Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स
Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ या दोन्ही फोन्सचे बहुतांश स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत. फक्त Redmi Note 11 Pro+ मधील 4500mAh ची बॅटरी 120W fast charging सपोर्टसह सादर करण्यात आली आहे. तर Redmi Note 11 Pro मधील 5000mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. दोन्ही फोन्समध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि पंच होल डिजाईनसह आला आहे. दोन्ही रेडमी फोन्समध्ये ऑक्टकोर मीडियाटेक डिमेंसीटी 920 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. दोन्ही फोन्समध्ये ड्युअल सिमेट्रिक JBL-ट्यून स्टिरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. जे डॉल्बी अॅटमॉस आणि हाय-रेज ऑडिओला सपोर्ट करतात. कनेक्टिव्हिटीसाठी या फोन्समध्ये NFC, GPS, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक मिळतो. हे दोन्ही फोन IP53 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह सादर झाले आहेत. तसेच यात VC लिक्विड कुलिंग देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: