Xiaomi नं ठरल्याप्रमाणे आपल्या Redmi Note 11 सीरिजमधील Pro मॉडेल्स भारतात सादर केले आहेत. कंपनीनं Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus स्मार्टफोन देशात एका लाँच इव्हेंटच्या माध्यमातून उतरवले आहेत. Redmi Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये 108MP कॅमेरा, 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग मिळते.
Redmi Note 11 Pro स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये 6.67इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डॉट नॉच डिजाईनसह आलेला डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 13 वर चालतो. कंपनीनं यात MediaTek Helio G96 प्रोसेसर सोबत ग्राफिक्ससाठी ARM Mali-G57 MC2 जीपीयू दिला आहे. या फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
Redmi Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह या फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 67W का फास्ट चार्जर देण्यात आला आहे.
Redmi Note 11 Pro ची किंमत
Redmi Note 11 Pro स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 19,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन 23 मार्चपासून शाओमीच्या वेबसाईटसह आणि अॅमेझॉनवरून विकत घेता येईल.
हे देखील वाचा: