शाओमीच्या Redmi Note 11 सीरिजची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. कारण ही कंपनीची लोकप्रिय सीरिज आहे, ज्यात बजेटमध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स दिले जातात. आता Redmi Note 11 series ची संभाव्य लाँच डेट समोर आली आहे. ही सीरिज कंपनीच्या होम मार्केटमध्ये 28 ऑक्टोबरला लाँच केली जाईल, अशी माहिती कंपनीने पोस्टर शेयर करून दिली आहे.
लाँच डेट आणि किंमत
Redmi ने शेयर केलेल्या पोस्टर्सनुसार आगामी Redmi Note 11 series चीनमध्ये 28 ऑक्टोबर रोजी सादर केली जाईल. तसेच चीनमध्ये या सीरिजची प्री-बुकिंग देखील सुरु करण्यात आली आहे. Redmi Note 11 स्मार्टफोनची किंमत चीनमध्ये 1,199 युआन (~ ₹ 14,000) पासून सुरु होऊ शकते. तर Redmi Note 11 Pro स्मार्टफोन 1,599 युआन (~ ₹ 18,800) मध्ये उपलब्ध होऊ शकतो.
डिजाईन
Redmi ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर काही टीजर पोस्टर शेयर केले आहेत. यातून फोनच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे. या सीरिजमध्ये iPhone 13 प्रमाणे फ्लॅट एज डिजाइन मिळेल. तसेच कंपनी या फोनमध्ये JBL चे स्पिकर देणार आहे. हा फोन ड्युअल स्पिकर सेटअपसह सादर केला जाईल. या आगामी सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, IR ब्लास्टर, साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि क्वाड कॅमेरा सेटअप दिला जाईल.
संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 11 फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये 50MP चा मेन रियर कॅमेरा आणि 13MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. हा शाओमी फोन मीडियाटेकच्या Dimensity 810 चिपसेटसह सादर केला जाईल. Redmi Note 11 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग दिली जाईल.
Redmi Note 11 Pro स्मार्टफोनला MediaTek Dimensity 920 SoC ची ताकद दिली जाऊ शकतो. तसेच 8GB पर्यंतचा RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. या डिवाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. पॉवरबॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी 67W किंवा 120W फास्ट चार्जिंगसह सादर केली जाऊ शकते.