Xiaomi नं ट्वीटरवरून Redmi Note 11s च्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. कंपनीनं या स्मार्टफोनचा थेट उल्लेख केला नाही. परंतु दिलेल्या हिंट्सवरून हा रेडमी नोट 11एस असेल, हे स्पष्ट झालं आहे. कंपनीनं अचूक अशी तारीख न सांगता ‘कमिंग सून’ लिहलं आहे. Redmi Note 11S स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 8GB RAM आणि 90hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाऊ शकतो.
Redmi Note 11S चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार, Redmi Note 11S स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 13 सह बाजारात येईल. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity च्या 5G प्रोसेसरसह येऊ शकतो. फोन 6GB/64GB, 6GB/128GB आणि 8GB/128GB अशा तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटसह बाजारात येईल.
Redmi Note 11S स्मार्टफोनमध्ये LCD किंवा AMOLED डिस्प्ले पॅनलचा वापर केला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 90hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात 108MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सोबत 8MP आणि 2MP चे अजून दोन सेन्सर मिळू शकतात. सेल्फीसाठी या फोनमध्ये 13MP चा कॅमेरा मिळू शकतो. फोनच्या बॅटरी आणि चार्जिंग फीचरची माहिती मात्र मिळाली नाही. परंतु हा फोन Redmi Note 10S प्रमाणेच बजेट सेग्मेंटमध्ये एक गेमिंग स्मार्टफोन म्हणून सादर केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
LPG Subsidy चे पैसे अकॉउंटमध्ये येत आहेत कि नाही असे करा चेक; सहज करता येणार तक्रार
PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम