Xiaomi Redmi Note 11T 5G Price Launch: Xiaomi आपल्या सब-ब्रँड अंतर्गत स्वस्त 5G Phone सादर करणार आहे. हा फोन Redmi Note 11T 5G नावाने भारतात दाखल होईल. आता हा आगामी रेडमी डिवाइस अॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला आहे. 30 नोव्हेंबरच्या लाँच नंतर Redmi Note 11T स्मार्टफोन अॅमेझॉनवरून विकत घेता येईल. या लिस्टिंगमधून फोनच्या डिजाइन आणि काही फीचर्सची माहिती मात्र मिळाली आहे.
Redmi Note 11T 5G अॅमेझॉन लिस्टिंग
Xiaomi Redmi Note 11T 5G च्या अॅमेझॉन लिस्टिंगनुसार हा फोन ड्युअल 5G सपोर्टसह बाजारात येईल. म्हणजे या फोनमधील दोन्ही सिम एकाच वेळी 5G नेटवर्कचा वापर करू शकतील. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात येईल, ज्याला स्विफ्ट डिस्प्ले असे नाव देण्यात आले आहे. तर रॅम बूस्टर फिचरच्या मदतीने फोनचा रॅम कमी झाल्यास इंटरनल मेमरीचा रॅम म्हणून वापर करता येईल.
Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन्स
Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. जो 2.4Ghz क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात येईल.
रेडमी नोट 11टी स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.