शिओमी रेडमी नोट ४ या स्मार्टफोनने लोकप्रियतेचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. अत्यंत किफायतशीर दरात उत्तमोत्तम फिचर्सने युक्त असणार्या या मॉडेलला ग्राहकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. हे मॉडेल २ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज. ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज अशा तीन पर्यायांमध्ये बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे. मध्यंतरी याच्या दोन्ही व्हेरियंटचे मूल्य एक हजारांनी कमी करण्यात आले होते. यातील ४ जीबी रॅमच्या व्हेरियंटचे मूल्य पुन्हा एकदा एक हजार रूपयांनी कमी करण्यात आला आहे. अर्थात हे व्हेरियंट आता ग्राहकांना फक्त १०,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. तर २ आणि ३ जीबी रॅमचे व्हेरियंट आधीच्याच म्हणजे ८,९९९ आणि ९,९९९ रूपयात उपलब्ध आहेत.
फिचर्सचा विचार केला असता, शिओमी रेडमी नोट ४ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा २.५ डी वक्राकार डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात ऑक्टॉ-कोअर स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या मार्शमॅलो या प्रणालीवर चालणारे असून यात ४१०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. यातील कॅमेरे हे १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणार्या या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील प्रदान करण्यात आले आहे.