Xiaomi ने ग्लोबल लाँचच्या आधी नवीन वियरेबल कॉन्सेप्ट प्रोडक्ट सादर केला आहे. Xiaomi ने आपला पहिला Smart Glasses लाँच केले आहेत. काही दिवसांपूर्वी फेसबुकने प्रसिद्ध ब्रँड रे-बॅन सोबत मिळून आपले स्मार्ट ग्लासेस सादर केले होते, ज्यात डिस्प्ले नव्हता परंतु कॉल, म्युजिक आणि फोटो कॅप्चार करण्यासाठी कॅमेरा देण्यात आला होता. परंतु शाओमीचे स्मार्ट ग्लासेस वेगळे आहेत, यात कॉल्स, म्युजिक, कॅमेरा आणि मॅप नेव्हिगेशनसह डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.
Xiaomi ने हे स्मार्ट ग्लासेस चीनमध्ये सादर केले आहेत. हे कॉन्सेप्ट स्मार्ट ग्लासेस आहेत, त्यामुळे हे अजून खरेदीसाठी उपलब्ध झाले नाहीत. या कॉन्सेप्ट स्मार्ट ग्लासेसमध्ये MicroLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Xiaomi च्या कॉन्सेप्ट ग्लासेसचा वापर युजर्स नोटिफिकेशन्स, इमेज क्लिक, कॉलिंग आणि नेव्हिगेशन, रियल टाइम ट्रान्सलेशनसह टेलीप्रॉम्टरप्रमाणे वापर करता येईल. तसेच सामान्य चष्म्यांप्रमाणे हे वापरता देखील येतील. यातील MicroLED मोनोक्रोम डिस्प्लेची ब्राईटनेस 2 मिलियन निट्स इतकी आहे. या ग्लासेसमधील चिपचा आकार 2.3mm x 2.02mm इतका आहे, जी चष्म्याच्या फ्रेममध्ये फिट होते. यात ऑप्टिकल वेवगाइड टेक्नॉलॉजीचा वापर कंपनीने केला आहे.
शाओमी स्मार्ट ग्लासमध्ये 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच कॉलिंगसाठी मायक्रोफोन आणि स्पिकर देखील मिळतात. हा चष्मा त्वरित ऑडियो टेक्स्टमध्ये रूपांतरित करू शकतो. यासाठी कंपनीने XiaoAI असिस्टंटचा वापर या चष्म्यात केला आहे. तुमच्या फोनवरील नोटिफिकेशन तर या चष्म्यावर दिसतीलच परंतु स्क्रीन मिररिंगचा वापर करून जे तुमच्या स्मार्टफोनवर असेल ते सर्व दिसेल. या चष्म्यात क्वॉडकोर ARM प्रोसेसर आणि इंटीग्रेटेड बॅटरी देण्यात आली आहे. तसेच यात टच पॅड, वाय-फाय, ब्लूटूथ आणि कॅमेरा ऑन असल्याची माहिती देणारे लाईट इंडिकेटर देण्यात आला आहे.