Xiaomi TV Stick 4K : शाओमनं Xiaomi TV Stick 4K हे नवीन टीव्ही स्टिक डिवाइस लाँच केलं आहे आहे. गेल्यावर्षी आलेल्या Mi TV Stick चं हे अपग्रेडेड व्हर्जन आहे. नव्या मॉडेलमध्ये 4K स्ट्रीमिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच Xiaomi TV Stick 4K डॉल्बी विजन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. यातील Android TV 11 ऑपरेटिंग सिस्टम हा मोठा अपग्रेड म्हणता येईल.
Xiaomi TV Stick 4K सध्या फक्त कंपनीच्या जागतिक वेबसाईटवर लिस्ट करण्यात आली आहे. या लिस्टिंगमध्ये डिवाइसच्या किंमतीचा किंवा उपलब्धतेचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. परंतु कंपनीचा इतिहास पाहता ही स्टिक भारतात 3000 रुपयांच्या आसपास सादर केली जाऊ शकते.
Xiaomi TV Stick 4K चे स्पेसिफिकेसन्स आणि फीचर्स
Xiaomi TV Stick 4K चा वापर करून तुम्ही जुन्या एलईडी आणि एलसीडी टीव्हीला स्मार्ट बनवू शकता. शाओमी टीव्ही स्टिकमध्ये Amazon Prime Video, Netflix आणि YouTube असे स्ट्रीमिंग अॅप्स प्री-इंस्टॉल्ड मिळतात. यात Dolby Atmos आणि Dolby Vision सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ही स्टिक Android TV 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालते.
तसेच शाओमी टीव्ही स्टिक 4K मध्ये चार कोर असलेला Cortex-A35, Mali-G31 MP2 GPU आणि 2GB RAM प्रोसेसिंगची जबाबदारी सांभाळतात. या स्टिकमध्ये 8GB स्टोरेज देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात यात ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ 5.0 इत्यादी ऑप्शन्स मिळतात. तसेच HDMI पोर्ट आणि मायक्रो USB पोर्ट पॉवर कनेक्शनसाठी देण्यात आला आहे.