Xiaomi 12 सीरीजमधील स्मार्टफोन्ससह कंपनीनं Xiaomi Watch S1 नावाचा स्मार्टवॉच देखील सादर केला आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात प्रीमियम स्मार्टवॉच आहे. ज्यात रिफाइंड स्टेनलेस-स्टील फ्रेम आणि सफायर ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. सिंगल चार्जवर 12 दिवस चालणार हा स्मार्टवॉच लेदर रिस्टबँडसह सादर करण्यात आला आहे.
Xiaomi Watch S1 ची किंमत
शाओमीनं हा वॉच सध्या चीनमध्ये लाँच केला आहे. या वॉचचे दोन व्हेरिएंट बाजारात आले आहेत. यातील Viton रिस्टबँड ऑप्शनची किंमत 1,049 युआन (जवळपास 12,300 रुपये) आणि लेदर रिस्टबँड ऑप्शनची किंमत 1,099 युआन (जवळपास 12,900 रुपये) आहे.
Xiaomi Watch S1 चे फीचर्स आणि स्पेक्स
शाओमी वॉच S1 मध्ये 1.43 इंचाचा वर्तुळाकार AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 466x466 पिक्सल रिजॉल्यूशन असलेला हा डिस्प्ले सफायर ग्लासच्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. यात 117 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. तसेच हा 5ATM वॉटरप्रूफ बिल्डसह सादर करण्यात आला आहे.
शाओमी वॉच S1 मध्ये ब्लड-ऑक्सीजन सॅचुरेशन (SpO2) आणि हार्ट-रेट ट्रॅकिंग करता येते. तसेच लोकेशन ट्रॅकिंगसाठी GNSS पोजिशनिंग सपोर्ट आणि टचलेस पेमेंट करण्यासाठी NFC देखील आहे. कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये वाय-फाय 802.11 b/g/n आणि ब्लूटूथ v5.2 चा समावेश करण्यात आला आहे. या स्मार्टवॉचवर मेसेजेस आणि नोटिफिकेशन वाचता येतात. तसेच वॉचवरूनच व्हॉइस कॉल देखील करता येतील. शाओमी वॉच S1 मध्ये 470mAh ची बॅटरी आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर 12 दिवस बॅटरी लाईफ देते, असा दावा कंपनीनं केला आहे.
हे देखील वाचा:
घरीच मिळावा मोठी स्क्रीन! खूप कमी किंमतीत आला Xiaomi चा 70 इंचाचा जबरदस्त Smart TV
लै भारी! 35 हजारांच्या डिस्काउंटसह स्मार्टफोन घेण्याची शेवटची संधी, पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर