Xiaomi चा दुसरा ब्रँड Poco ने भारतीय बाजारात 48 मेगापिक्सल कॅमेराचा कमी किंमतीतला Poco M3 स्मार्टफोन लाँच केला आहे. पोको एम 2 च्या यशानंतर कंपनीने हा फोन आज लाँच केला.
Poco M3 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 देण्यात आला आहे. 128 जीबीचे स्टोरेज देण्यात आले आहे. वेगवेगळ्या रंगामध्ये हा फोन उपलब्ध करण्यात आला आहे. जागतिक स्तरावर पोकोने पोको एम सिरीज लाँच केली होती. नोव्हेंबरमध्ये Poco M2 आणि Poco M2 Pro लाँच करण्यात आले होते.
पोको ही कंपनी शाओमीने भारतीय बाजारासाठी वेगळी केली आहे. 2018 मध्ये पोकोचा पहिला फोन लाँच झाला होता. पोको एम 3 हा कंपनीचा या सिरीजमधला तिसरा फोन आहे. या फोनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरु होते. 6GB + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर 9 फेब्रुवारीपासून विक्री सुरु केली जाणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 1000 तत्काळ डिस्काऊंट मिळणार आहे.
स्पेसिफिकेशनपोको एम3 मध्ये ड्युअल सिम, MIUI 12 असलेले Android 10, 6.53 इंचाची फुल एचडी प्लस स्क्रीन, 1,080x2,340 pixels रिझोल्युशन, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आली आहे. पाठीमागे ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगा पिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगा पिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगा पिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.
हा फोन कूल ब्ल्यू, पोको यलो आणि पावर ब्लॅक अशा रंगात उपलब्ध आहे. या फोनची स्टोरेज स्पेस 512GB पर्यंत वाढविण्यात येऊ शकणार आहे. फोनला 6,000mAh ची बॅटरी 18 W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आली आहे. फोनचे वजन 198 ग्रॅम आहे. साईडला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. USB Type-C देण्यात आला आहे.