Yamaha कंपनीने भारतात साऊंडबारचे दोन मॉडेल लाँच केले आहेत. Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A नावाने दोन साऊंडबार मॉडेल भारतात लाँच झाले आहेत. Yamaha SR-C20A 100W साऊंड आउटपुट देतो, तर SR-B20A मध्ये 120W साऊंड आउटपुट मिळतो. दोन्ही मॉडेल्समध्ये TV ARC सपोर्टसह एक HDMI आउट पोर्ट, ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि चार सराऊंड साऊंड मोड देण्यात आले आहेत. वाईट प्रदान करते आहेत. Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A साऊंडबार एका अॅपच्या माध्यमातून कंट्रोल करता येतील.
Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A ची किंमत
Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A या दोन्ही साऊंडबार्सची किंमत 20,490 रुपये आहे. परंतु अमेझॉनवर Yamaha SR-C20A 18,190 रुपयांमध्ये तर Yamaha SR-B20A 19,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.
Yamaha SR-C20A, Yamaha SR-B20A: स्पेसिफिकेशन आणि फीचर्स
Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A 2.1 चॅनेल सेटअपसह येतात. SR-C20A मध्ये डाव्या आणि उजव्या चॅनेलसाठी दोन 20W स्पीकरसोबत 60W बिल्ट-इन सबवूफर देण्यात आला आहे. हा सबवूफर 100W चा साऊंड आउटपुट देतो. SR-B20A मध्ये दोन 30W लेफ्ट आणि राईट चॅनेल स्पीकर आहेत आणि 60W चा बिल्ट-इन सबवूफर आहे जो एकूण 120W चा आउटपुट देतो.
दोन्ही साऊंडबारमध्ये स्टीरियो, स्टॅंडर्ड, मूवी आणि गेम सराउंड साऊंड असे चार मोड देण्यात आले आहेत. हे दोन्ही डिवाइस एका अॅपच्या माध्यमातून कंट्रोल करता येतात, सोबत एका रिमोट देखील देण्यात आला आहे. Yamaha SR-C20A चे वजन 1.8kg आहे तर, Yamaha SR-B20A चे वजन 3.2kg आहे. दोन्ही साऊंडबार वॉल माउंटिंग सपोर्टसह येतात.