Smartwatch: Smartwatch मध्ये अनेक हेल्थ फीचर्स मिळतात, परंतु रक्तदाब मोजण्याचा सेन्सर मिळत नाही. काही दिवसांपूर्वी Huawei जगातील पहिला BP Monitor Smartwatch बनवणार असल्याची बातमी आली होती. परंतु हा मान आता BP Doctor MED नं मिळवला आहे. कंपनीनं ब्लड प्रेशर मॉनिटर करणारा जगातील पहिला स्मार्टवॉच YHE BP Doctor MED सादर केला आहे.
YHE BP Doctor MED ची किंमत
Gizmochina च्या रिपोर्टनुसार, YHE BP Doctor MED ची किंमत Indiegogo वर 189 डॉलर्स (अंदाजे 14000 रुपये) ठेवण्यात आली आहे. परंतु सामान्य ग्राहकांना हा स्मार्टवॉच 359 डॉलर्स (सुमारे 27000 रुपये) मध्ये विकत घ्यावा लागेल. या स्मार्टवॉचच्या शिपिंगसाठी जानेवारी 2022 ची वाट बघावी लागेल. कंपनी हा स्मार्टवॉच जगभरात डिलिव्हर करणार आहे.
YHE BP Doctor MED चे स्पेसिफिकेशन
YHE BP Doctor MED स्मार्टवॉचमध्ये 1.63 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचला ब्लड प्रेशर मॉनिटरिंगच्या अचूकतेचे सर्टिफिकेट CE आणि FDA कडून मिळालं आहे. ज्या युरोप आणि अमेरिकेतील संस्था आहेत. BP Doctor MED मेडिकल-ग्रेड अॅक्यूरेसी असलेलाल जगातील सर्वात पहिला कन्ज्यूमर-ग्रेड स्मार्टवॉच आहे.
ब्लड प्रेशर मोजण्यासाठी BP Doctor MED मध्ये दोन बाजूंना इन्फ्लेटेबल (फुगणारे) कफ देण्यात आले आहेत. ज्यांच्या मदतीने अचूक ब्लड प्रेशर रीडिंग मिळते. या स्मार्टवॉचमध्ये स्लीप ट्रॅकिंग आणि पुश नोटिफिकेशन असे फीचर्स देखील मिळतात. या स्मार्टवॉचमधील 220 एमएएच बॅटरी सिंगल चार्जवर 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते.