शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

JioPhone Next 4G बुक करण्याआधी त्याच किंमतीत येणाऱ्या या स्मार्टफोन्सवर टाका एक नजर; पाहा यादी

By सिद्धेश जाधव | Published: November 03, 2021 6:55 PM

Jio Phone Next 4G India Alternatives: Jio Phone Next 4G Smartphone च्या ऐवजी त्याच बजेटमध्ये Infinix Smart 5A, Lava Z2, Xiaomi Redmi 9A आणि Realme C11 चे पर्याय उपलब्ध आहेत.

जूनपासून भारतीय Jio Phone Next 4G ची वाट बघत होते. सप्टेंबरमध्ये या फोनने हुलकावणी देखील दिली परंतु Jio-Google च्या भागेदारीत बनलेला हा फोन अखरेसी दिवाळीच्या मुहूर्तावर उपलब्ध झाला आहे. या डिवाइसची किंमत आणि स्पेक्सचे मिश्रण पाहून टेक विश्वात मात्र नाराजीचा व्यक्त करण्यात आली आहे. हा फोन कोणत्याही ईएमआय प्लॅनविना 6,499 रुपयांमध्ये थेट विकत घेता येईल. पंरतु या बजेटमध्ये इतर अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया कोणते फोन्स देत आहेत Jio Phone Next 4G ला टक्कर.  

Jio Phone Next 4G च्या बजेटमध्ये उपलब्ध असलेले इतर पर्याय:  

Infinix Smart 5A

जेव्हा जियोफोन नेक्स्टला पर्याय कोणता? हा प्रश्न विचारला जातो तेव्हा कमेंटमध्ये Infinix Smart 5A चे नाव येतेच. हा फोन लेटेस्ट Android 11 OS वर चालतो. यात 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. रियर फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये DTS सराऊंड साउंड सपोर्ट असलेले स्पीकर देखील मिळतात. यात क्वॉड कोर MediaTek Helio A20 SoC ची ताकद देण्यात आली आहे. तसेच यातील 8MP मुख्य सेन्सर असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 8MP चा सेल्फी शुटर देण्यात आला आहे. Infinix Smart 5A फ्लिपकार्टवर 6,699 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.  

Lava Z2

जर स्वदेशी कंपनी म्हणून जियोकडे वळणार असाल तर तुम्ही लावा मोबाईल्सबद्दल विसरला आहात. Lava Z2 स्मार्टफोन Android 11 (Go Edition) सह सादर करण्यात आला आहे. यात 6.5-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ऑक्टकोर MediaTek Helio प्रोसेसर मिळतो. विविध फोटोग्राफी मोडसह कंपनीने यात 8MP चा रियर कॅमेरा सेन्सर दिला आहे. हा डिवाइस 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी यात 5000mAh ची बॅटरी मिळते परंतु फिंगरप्रिंट स्कॅनरचा पर्याय मिळत नाही. या फोनचा 2GB व्हेरिएंट 7,399 रुपयांमध्ये कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

Xiaomi Redmi 9A

Redmi 9A जियो फोन नेक्स्टला हार्डवेयर आणि डिजाईनच्या बाबतीत चांगली टक्कर देतो. यात 6.53-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन P2i कोटिंगमुळे पाण्याच्या शिंतोड्यांपासून वाचतो. या फोनमध्ये ऑक्ट-कोर MediaTek Helio G25 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच यात 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP सेल्फी शुटर मिळतो. Redmi 9A ची किंमत 6,999 रुपये आहे. 

Realme C11

जियोच्या नव्या 4G स्मार्टफोनला Realme C11 कडून तगडे आव्हान मिळते. यात 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आणि MediaTek Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा कंपनीने दिला आहे. तसेच Android 10 सह येणारा हा फोन 5000mAh बॅटरीला सपोर्ट करतो. फक्त यात फिंगरप्रिंट सेन्सर मिळत नाही. Realme C11 स्मार्टफोन 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Jio Phone Next Specification   

या फोनमध्ये 5.45-इंचाचा (720 X 1440 पिक्सल) एचडी डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास-3 सह सादर केला जाईल. फोनयामध्ये 2जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल मेमरी मिळेल. ही मेमरी 512जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डनेवाढवता येईल. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 215 चिपसेट मिळेल.   

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. Jio Phone Next मध्ये 3500एमएएचची बॅटरी देण्यात येईल. जियोफोन नेक्स्ट गुगल अँड्रॉइडने बनवलेल्या प्रगती ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. तसेच यात अनेक जियो आणि गुगल अ‍ॅप्स प्रीलोडेड मिळतील.    

हा एक ड्युअल सिम फोन आहे त्यामुळे जियो व्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या सिमचा देखील वापर करता येईल. परंतु एक सिम स्लॉटमध्ये जियो सिम टाकणे बंधनकारक असेल. तसेच डेटा फक्त जियो सिमवरून वापरता येईल. दुसऱ्या सिमचा वापर फक्त कॉलिंगसाठी करता येईल.    

 

टॅग्स :JioजिओSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड