नवी दिल्ली : मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नोव्हेंबर 2017 मध्ये delete for everyone असे फीचर लॉन्च केले होते. जर तुम्ही दुस-या ग्रुपवर एखादा मेसेज पाठविला तर या फीचरने तो डिलिट करता येतो. मात्र, एखाद्याने तुम्हाला व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज डिलिट केला असेल आणि तो मेसेज काय असेल, असे तुम्हाला नक्कीच वाटत असणार. त्यामुळे आता असा डिलिट केलेला मेसेजही तुम्हाला वाचता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला Notification Histrory हे अॅप डाउनलोड करावे लागणार आहे.
स्मार्टफोनमध्ये काय पाहिजे...- तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप इन्स्टॉल केलेले पाहिजे. - तुमच्या स्मार्टफोनला इंटरनेट कनेक्शन असायला हवे.- तुमचा स्मार्टफोन अॅन्ड्राईड व्हर्जन 4.4 किटकॅटच्या वरील व्हर्जन पाहिजे.
WhatsAppवर डिलिट केलेल मेसेज पुन्हा वाचण्यासाठी काय करावे....- नोटिफिकेशन हिस्ट्री (Notification Histrory) अॅप डाऊनलोड करा.- अॅप ओपन करा आणि त्यातील नोटिफिकेशन आणि अॅडमिनिस्ट्रेटर अॅक्सेस सुरू करा. - त्यानंतर हे अॅप तुमची नोटिफिकेशन हिस्ट्री रेकॉर्ड करायला सुरू करेल. त्यानंतर हे अॅप ओपन करा आणि व्हॉट्सअॅप आयकॉनवर क्लिक करा. - हे सर्व केल्यानंतर पुढे तुम्हाला पाठविलेला मेसेज ज्याने डिलिट केला, त्याचा कॉन्टॅक्ट सर्च करा. त्यानंतर अगदी सहजपणे डिलिट केलाला मेसेज पाहता येऊ शकतो.