नवी दिल्ली - सोशल मीडियावर फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणारं इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. एखादा व्हिडीओ पाहताना आपल्याला हवा असल्यास तो आपण रिवाइंड करू शकतो. मात्र इन्स्टाग्रामवर युजर्सना तो व्हिडीओ रिवाइंड करण्याची सुविधा नाही. त्यांना तो व्हिडीओ पूर्ण संपेपर्यंत वाट पाहावी लागते. पण आता इन्स्टाग्राम युजर्ससाठी एक खूशखबर आहे. इन्स्टाग्राम एक नवीन फीचर आणणार असून या फीचरच्या मदतीने व्हिडीओ आता रिवाइंड करणे शक्य होणार आहे. इन्स्टाग्राम apk फाइलमध्ये @wongmjane च्या डेवलपरने याबाबत माहिती दिली आहे.
इन्स्टाग्राम व्हिडीओ सीक बारची चाचणी घेत आहे. तसेच एखाद्या व्हिडीओच्या सीक बारवर क्लिक करून कोणत्याही सेकंदावर घेऊन जाऊन तो व्हिडीओ पाहता येणार आहे. मात्र इन्स्टाग्रामच्या या नव्या फीचरचा फटका हा काही युजर्सना बसणार आहे. कारण आधी रिवाइंडचा पर्याय उपलब्ध नसल्याने युजर्स एका व्हिडीओवर बराच वेळ थांबून राहत होते. मात्र आता या फीचर नंतर ते इन्स्टा युजर्स फक्त आपल्याला हवा असलेला व्हिडीओचा भाग ड्रॅग करून पाहू शकतात. इन्स्टाग्रामचं व्हिडीओ रिवाइंडचे हे फीचर लवकरच येणार असल्याची माहिती मिळत आहे.
आता इन्स्टाग्रामवर सुद्धा करा शॉपिंग, नवीन फीचर लाँच!
सोशल मीडियात लोकप्रिय असणारे इन्स्टग्राम आता ई-कॉमर्समध्ये उतरले आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी इन्स्टाग्रामवर निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे. अमेरिकेत प्रायोगिक तत्वावर याची सुरुवात करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम अॅपमध्ये नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदीची सुविधा देण्यात आली आहे. इन्स्टाग्राम फेसबुकचीच एक कंपनी आहे. या कंपनीने एक ऑनलाइन पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'आम्ही इन्स्टाग्रामवर उत्पादने खरेदी करण्याची सुविधा देत आहेत. जर तुम्हाला काही उत्पादने आवडली असतील, तर इन्स्टाग्राम अॅपच्या माध्यमातून खरेदी करु शकता.' याचबरोबर, इन्स्टाग्राम अॅपमध्ये चेकआऊट बटनवर क्लिक केल्यानंतर उत्पादनांची संपूर्ण माहिती ग्राहकांना मिळणार आहे. यामधून ग्राहक आपल्या आवडीची उत्पादने खरेदी करु शकतात, असे कंपनीने म्हटले आहे.
इन्स्टाग्रामने आणलं नवं फीचर, अश्लील फोटो ब्लर ठेवणारइन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. सेन्सिटिव्ह स्क्रीन असं या नव्या फीचरचं नाव असून इन्स्टाने हे फीचर लॉन्च केले आहे. या फीचरमुळे अश्लील फोटो, व्हिडीओ, थंबनेल्स युजर्सने क्लिक करेपर्यंत ब्लर दिसणार आहेत. वोग डॉट को डॉट यूकेच्या अहवालानुसार, भारतात इन्स्टाग्राम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हे फीचर आहे. अश्लील, वादग्रस्त कमेंट्सला आळा घालण्यासाठी इन्स्टाग्रामने हे पाऊल उचललं आहे. अल्पवयीन मुला-मुलींना नुकसान पोहचू नये यासाठी हे फीचर उपयोगी ठरणार आहे.