मोबाईलवर तासंतास गेम खेळण्यामुळे लोक वेडे झाल्याचे पाहिले आहे. कोल्हापुरातच धक्कादायक प्रकार समोर आला होता. हे गेम खेळणे म्हणजे आपल्यासाठी वेळ घालवणे असते. मात्र, असाच एक व्यक्ती मोबाईल गेममुळे अब्जाधीश झाला आहे. सिंगापूरच्या गैंग यी यांच्याबाबतीत हा प्रवास आहे.
गैंग यी हे गेम डेव्हलप करणारी कंपनी सी लिमिटेडचे सह संस्थापक आहेत. त्यांच्या कंपनीचा फ्री फायर हा गेम सध्या खूप लोकप्रिय होत आहे. सलग तिसऱ्या तिमाहीमध्ये सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या पाच गेममध्ये या गेमचे स्थान आहे. यामुळे यी यांचे सहकारी फॉरेस्ट ली यांची संपत्ती आधीच 10 आकड्यांमध्ये पोहोचली आहे. 1990 मध्ये चीनमधून सिंगापूरला यी आले होते. ते 2017 पासून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार कंपनीमध्ये त्यांची 8.4 टक्क्यांची भागीदारी आहे, ज्याचे मूल्य आता 1 अब्ज डॉलर आहे.
कंपनीचा मोठा व्यवसाय गेमिंगच आहे. यामुळे गुगल प्लेस्टोअरवर जेवढे डाऊनलोड मिळतील तेवढा जास्त फायदा या कंपन्यांना होतो. यामुळे यी यांच्या संपत्तीतही कमालीची वाढ झाली आहे. गेम डाऊनलोड केल्यावर अन्य कंपन्या त्यावर जाहिराती दाखवितात. शिवाय गुगलही प्ले स्टोअरला व्हिजीट वाढल्याने त्याचे पैसे कंपन्यांना देते. अशा प्रकारे लाखो डॉलरचे उत्पन्न या कंपन्यांना जात असते. यामुळे गेम खेळणारे फुकटात वेळ वाया घालवतात पण त्याचा फायदा या कंपन्यांच्या मालकांना होतो.
यी आणि ली हे गेमिंग सेक्टरमधील नवीन अब्जाधीश आहेत. त्यांच्या आधी फोर्टनाईट मेकर एपिक गेम्सचे निर्माते टीम स्वीनेय स्वीनेय (7.2 अब्ज डॉलर) आणि गाबे न्यूवेल (5.7 अब्ज डॉलर) यांनी कमावले आहेत.