मायक्रोसॉफ्टचा ऑनलाईन ब्रँड असणार्या यू टेलिव्हेंचरने नवीन स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत दिले असून याचा टिझर जारी करण्यात आला आहे.
मायक्रोमॅक्सने २०१४ साली यू टेलिव्हेंचर या ब्रँडच्या माध्यमातून पहिल्यांदा युरेका हा स्मार्टफोन सादर केला. याला बाजारपेठेत उत्तम प्रतिसाद मिळाला. मुळातच तेव्हा मायक्रोमॅक्सची भारतीय बाजारपेठेतील स्थिती अतिशय मजबूत होती. यामुळे आपल्या या उपकंपनीच्या माध्यमातून बाजारात अजून एक नवीन पर्याय उभा करण्याचे मायक्रोसॉफ्टचे मनसुबे होते. याबाबत या कंपनीने काहीही जाहीर केले नसले तरी यू टेलिव्हेंचरच्या स्थापनेचा हाच उद्देश असल्याची बाब उघड होती. याच्या मॉडेल्सला पहिल्यांदा चांगला प्रतिसाद लाभला. तथापि, चीनी कंपन्यांनी अतिशय स्वस्त स्मार्टफोनच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेवर जोरदार स्वारी केल्यामुळे मायक्रोमॅक्सला जोरदार हादरा बसला. अर्थात यू टेलिव्हेंचरही या झंझावातामध्ये टिकू शकले नाही. या कंपनीने गत वर्षी सप्टेंबर महिन्यात यू युरेका २ हे मॉडेल लाँच केले होते. यानंतर या कंपनीने एकही स्मार्टफोन लाँच केलेला नाही.
आता मात्र ही कंपनी लवकरच एक नवीन मॉडेल लाँच करणार असून याचा टिझर जारी करण्यात आला आहे. यासोबत काही लीक्सच्या माध्यमातून या नवीन प्रॉडक्टबाबत माहिती समोर आली आहे. याच्यातून मिळालेली माहितीनुसार हे नवीन मॉडेल यू एस हे असण्याची शक्यता आहे. मायक्रोमॅक्सने अलीकडेच अँड्रॉइड गो या प्रणालीवर चालणारा भारत गो हा स्मार्टफोन लाँच केलेला आहे. यानंतर या कंपनीने कोणतेही मॉडेल सादर केलेले नाही. यामुळे आता यू एस या मॉडेलबाबत औत्सुक्याचे वातावरण निर्मित झाले आहे.