नवी दिल्ली, दि. 17 - तैवानची कंपनी असूसने भारतात ZenFone Zoom S स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 26,900 रुपये असून कंपनीने म्हटले आहे की, वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने हा बाजारात आणला आहे. 19 ऑगस्ट रोजी वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्यात येतो. त्याआधी दोन दिवस ZenFone Zoom S या स्मार्टफोनच लॉन्चिग करण्यात आले आहे. तसेच, हा स्मार्टफोन फक्त ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येणार आहे. भारतीय मोबाईल बाजारात आलेल्या ZenFone Zoom S या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 5.5 इंच फुल एचडी एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, 2GHz क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरन स्टोरेज मेमरी सुद्धा देण्यात आली आहे. तर, मायक्रो एसडी कार्डच्यामाध्यमातून 2 टीबीपर्यंत मेमरी वाढवू शकता. याचबरोबर, ZenFone Zoom S या स्मार्टफोनला जास्त करुन फोटोग्राफी महत्व देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये दोन रिअर कॅमेरे दिले आहेत. यामधील एक 12 मेगापिक्सलचा असून अपर्चर f/1.7 आणि वाईल्ड अॅंगल आहे. तर, दुस-या कॅमे-यामध्ये 12 मेगापिक्सलाचा झूमचा ऑप्शन दिला असून यामध्ये 2.3X ट्रू झूम दिले आहे. तसचे, अनेक डिव्हाईस फीचर्स देण्यात आले आहेत. बॅटरी 5,000 mAh इतकी आहे.
काय आहेत फीचर्स?- 5.5 इंच फुल एचडी एमोलेड डिस्प्ले- 2GHz क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर- 4 जीबी रॅम - 64 जीबी इंटरन स्टोरेज मेमरी - 12 मेगापिक्सल कॅमेरा- 5,000 mAh बॅटरी