शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

झोलोचे तीन सेल्फी केंद्रीत स्मार्टफोन

By शेखर पाटील | Published: October 17, 2017 9:17 AM

झोलो कंपनीने इरा २ व्ही, इरा ३ आणि इरा ३एक्स हे खास सेल्फी प्रेमींसाठी स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून या तिन्ही मॉडेलची विक्री सुरू झाली आहे. अलीकडच्या काळात अनेक स्मार्टफोन सेल्फी स्पेशल स्मार्टफोन सादर करत आहेत. यात या तिन्ही मॉडेल्सची भर पडणार आहे. या सर्व स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमेर्‍यांमध्ये मूनलाईट सेल्फी प्रदान करण्यात आला आहे. अर्थात याच्या मदतीने चांगल्या दर्जाच्या सेल्फी घेता येतील असा दावा झोलो कंपनीने केला आहे. इरा २ व्ही या मॉडेलमधील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे हे अनुक्रमे १३ व ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील.  इरा ३ या स्मार्टफोनमध्ये ८ व ५ मेगापिक्सल्सचे तर इरा ३एक्स या मॉडेलमध्ये दोन्ही कॅमेरे १३ मेगापिक्सल्सचे असतील.

हे तिन्ही मॉडेल्स अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा हाईव्ह हा युजर इंटरफेस असेल. यात पाच इंच आकारमानाचा आणि एचडी (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले आहे. तर यात मीडियाटेक एमटी६७३७ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. इरा २व्ही या मॉडेलमध्ये २ जीबी रॅम देण्यात आली आहे. इरा ३ची रॅम एक जीबी तर इरा ३एक्सची रॅम तीन जीबी इतकी असेल. तर यात अनुक्रमे १६, ८ व १६ जीबी इतके इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आले असून ते मायक्रो-एसडीच्या मदतीने वाढविता येणार आहे. झोलो इरा ३ मध्ये २५०० मिलीअँपिअरची तर उर्वरित दोन्ही स्मार्टफोनमध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. तर यातील इरा ३ वगळता उर्वरित दोन्ही स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. तर या सर्व स्मार्टफोन्समध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. 

झोलो इरा ३ या स्मार्टफोनचे मूल्य ४,९९९; इरा २ व्ही या मॉडेलचे ६,४९९ तर इरा ३ एक्सचे मूल्य ७,४९९ रूपये इतके आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल