नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत असलेल्या झोमॅटोनेउबर या टॅक्सीसेवा पुरविणाऱ्या कंपनीचा भारतातील इबर इट या व्यवसाय विकत घेतला आहे. झोमॅटोने हा व्यवहार 2485 कोटी म्हणजेच 35 कोटी डॉलरला केला आहे. यामुळे झोमॅटो आणि उबर ट्विटरवर सकाळपासून ट्रेंड करत आहेत.
उबर ही कंपनी अॅपबेस टॅक्सी सेवा पुरविते. या कंपनीला भारतात उबर इटद्वारे काही यश मिळत नव्हते. या कारणामुळे झोमॅटोला विकण्याचा निर्णय घेण्यात आला. उबरकडे या कंपनीचे 9.9 टक्के समभाग राहणार आहेत. उबरने त्यांचा व्यवसाय केवळ भारतातच विकला आहे. अन्य देशांमध्ये इट्स उबरकडेच राहणार आहे. जर उबर एखाद्या बाजारपेठेमध्ये जम बसवू शकत नसेल तर ती बाजारपेठ सोडून देते. मात्र, उबर कॅब कंपनी सुरूच ठेवणार आहे.
उबर इट्सच्या ग्राहकांचे काय? जे ग्राहक उबर इट्समध्ये आहेत त्यांना झोमॅटोवर रिडायरेक्ट केले जाणार आहे. तसेच उबरच्या कर्मचाऱ्यांवरही नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते. झोमॅटो उबर इट्सच्या टीमला सामावून घेणार नसल्याचे समजते. असे झाले तर उबर इट्सच्या अन्य भागात य़ा कर्मचाऱ्यांना पाठविले जाऊ शकते.