ठळक मुद्दे३१ जुलै रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये झूमचा महसूल १ बिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडून गेला आहे.
‘आता कामाची ‘प्लेस’ नसते, ‘स्पेस’ असते आणि ही स्पेस तुम्हाला देते ‘झूम’. - हे उद्गार आहेत एरिक युआन यांचे. हे गृहस्थ म्हणजे कोरोना महामारीचे सर्वांत लाडके बाळ असलेल्या ‘झूम’ या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲपचे संस्थापक. कोरोनाच्या सावटातून हलके हलके बाहेर पडायला धडपडणारे जग त्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असले तरी ‘वर्क फ्रॉम होम’साठी, सहकारी आणि नातलगांच्या संपर्कात राहण्यासाठी ‘झूम’चा वापर मात्र कमी झालेला नाही.
३१ जुलै रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये झूमचा महसूल १ बिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडून गेला आहे. लसीकरण पूर्ण झालेले लोक हलके हलके कामावर परतू लागलेले असले तरी ‘हायब्रीड वर्क’ नावाचे नवे मॉडेल झूमसारख्या साधनांची चलती चालूच ठेवील, हे अर्थातच उघड आहे.