18GB RAM Phone: चिनी कंपनी ZTE ने यावर्षी मे मध्ये Axon 30 Ultra स्मार्टफोन सादर केला होता. आता या स्मार्टफोनच्या एका नवीन लिमिटेड एडिशनची घोषणा कंपनीने केली आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात मिळणार 18GB RAM आणि 1TB स्टोरेज. Axon 30 Ultra Aerospace एडिशन चीनमध्ये 25 नोव्हेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. या लिमिटेड एडिशन मध्ये 1TB इंटरनल स्टोरेज आणि 64MP चे तीन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत.
Axon 30 Ultra Aerospace
Axon 30 Ultra Aerospace Edition मध्ये फक्त 18GB RAM मिळणार नाही तर त्यासोबत व्हर्च्युअल रॅमचा पर्याय देखील देण्यात येईल. या अतिरिक्त रॅममुळे फोनमध्ये एकूण 20GB रॅम मिळेल. तसेच यात 1TB ची अवाढव्य आणि वेगवान UFS 3.1 स्टोरेज देण्यात येईल. या फोनचे इतर स्पेक्स Axon 30 Ultra सारखे असतील, ज्यात स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटचा समावेश असेल.
तसेच फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रेजॉलूशन असलेला 6.67 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले HDR10+, 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा फोन क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह 64 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स, 64 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 5x ऑप्टिकल झूम सपोर्टसह 8 मेगापिक्सलची टेलिफोटो लेन्स मिळेल. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात येईल.