एक काळ होता जेव्हा 2GB रॅम असलेले स्मार्टफोन्स हायएंड समजले जायचे. सध्या 3 ते 4GB रॅम असलेले स्मार्टफोन्स सहज उपलब्ध होतात. हायएंड स्मार्टफोन्समध्ये देखील 12GB पर्यंत रॅम मिळतो, तर गेमिंग स्मार्टफोन्समध्ये 16GB रॅम आणि 18GB पर्यंत रॅम देण्यात येतो. Lenovo Legion आणि ASUS ROG Phone 5 या स्मार्टफोन्सनी ही कमाल करून दाखवली आहे. परंतु, स्मार्टफोन निर्माता कंपनी ZTE याच्याही पुढे जात लवकरच 20GB रॅम असलेला स्मार्टफोन घेऊन येणार आहे.
ही अविश्वसनीय बातमी कंपनीच्या कर्मचाऱ्याने दिली आहे. स्मार्टफोन निर्माता कंपनी ZTE चे एग्जीक्यूटिव Lu Qianhao यांनी कंपनीच्या 20GB रॅम असेलल्या स्मार्टफोनची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली आहे. Lu Qianhao यांनी चिनी सोशल मीडिया साईट विबोवर कंपनीच्या या नवीन प्रोजेक्टची माहिती दिली आहे. हा फोन अस्तित्वात येऊन कधी लाँच केला जाईल, याची किंमत किती असेल किंवा इतर स्पेसीफिक्सशन्स कसे असतील, याची कोणतीही माहिती लू यांनी दिलेली नाही.
ZTE च्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 18GB रॅम + 2GB वर्च्युल रॅम देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच एवढ्या जास्त रॅमसह येणारा स्मार्टफोन नक्कीच फ्लॅगशिप असेल आणि यात हायएंड चिपसेट देण्यात येईल, अशी चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, या स्मार्टफोनमध्ये अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा देखील देण्यात येईल. लवकरच या जबरदस्त स्मार्टफोनची संपूर्ण माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे.