आदेश बांदेकर खेळणार आता 'हा' नवा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 10:55 AM2018-11-19T10:55:14+5:302018-11-19T11:01:57+5:30

सर्वांचं मनोरंजन करणारा खेळ म्हणजे गाण्यांच्या भेंड्या आणि हाच खेळ झी मराठी एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.

Aadesh Bandekar will now play 'This' new game | आदेश बांदेकर खेळणार आता 'हा' नवा खेळ

आदेश बांदेकर खेळणार आता 'हा' नवा खेळ

googlenewsNext
ठळक मुद्देभाऊजी आता एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत

भाऊजी म्हंटल कि डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पैठणीचा खेळ आणि भाऊजींचं औक्षण करणाऱ्या वाहिनी. भाऊजींनी त्यांच्या मिश्किल स्वभावाने या पैठणीच्या खेळात इतकी रंगत आणली कि ही कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आणि गेली १४ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेला पैठणीचा खेळ अजूनही तितकाच रंजक आहे. पण आता हेच भाऊजी आता एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

झी मराठी वाहिनीवर चला हवा येऊ द्या, आम्ही सारे खवय्ये आणि होम मिनिस्टर नंतर अजून २ नवीन कथाबाह्य कार्यक्रम सादर होणार आहेत. फावल्यावेळात सर्वांचं मनोरंजन करणारा खेळ म्हणजे गाण्यांच्या भेंड्या आणि हाच खेळ झी मराठी एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दुसरं तिसरं कोणी नाही तर खुद्द आदेश बांदेकर करणार आहेत. या कार्यक्रमाबद्दलची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. पण प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणारी ही अंताक्षरी या महिन्याच्या अखेरीस सादर होणार आहेत हे मात्र नक्की.

या अनोख्या कार्यक्रमाबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, "झी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांसाठी वेग वेगळ्या धाटणीचे कार्यक्रम सादर करते. त्यामुळे ही पूर्वीपासून चालत आलेला खेळ एका वेगळ्या आणि रंजक रूपात आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. प्रेक्षक मला होम मिनिस्टर नंतर एका वेगळ्या कार्यक्रमात बघणार आहेत त्यामुळे मी देखील या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहे आणि मी आशा करतो की प्रेक्षकांना देखील ही कार्यक्रम आवडेल."

 

Web Title: Aadesh Bandekar will now play 'This' new game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.