'अप्सरा आली'मध्ये होणार वाईल्ड कार्ड एंट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 04:23 PM2019-01-28T16:23:52+5:302019-01-28T16:25:48+5:30
या कार्यक्रमातून सुरु झालेल्या १४ अप्सरांच्या प्रवासात आता फक्त ६ अप्सरा उरल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार आहे.
महाराष्ट्राची लावणीची परंपरा जिवंत ठेवत, युवा पिढीला या पूर्वापार चालत आलेल्या लोकप्रिय नृत्याची ओळख करून देण्यासाठी झी युवा वाहिनीने 'अप्सरा आली' हा बहारदार लावणी नृत्याचा कार्यक्रमनुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध लोकनृत्य 'लावणी'ला मंच उपलब्ध करून देणाऱ्या अप्सरा आली या कार्यक्रमात बुधवार ते शुक्रवार प्रेक्षक महाराष्ट्रातील लावण्यवतींची अदाकारी अनुभत आहेत. या कार्यक्रमात फक्त महाराष्ट्रच नव्हे तर चक्क परदेशातूनदेखील लावण्यवतींनी सहभाग घेतला आहे.
या कार्यक्रमातून सुरु झालेल्या १४ अप्सरांच्या प्रवासात आता फक्त ६ अप्सरा उरल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार आहे. सध्या स्पर्धेत असलेल्या अप्सरांना टक्कर देण्यासाठी नवीन अप्सरा मंचावर सज्ज होणार आहेत. मानसी शर्मा, किन्नरी दामा, शिल्पा ठाकरे आणि श्रुती कदम या चार अप्सरा बाकीच्या स्पर्धकांना चॅलेंज करणार आहेत. किन्नरी ही मुंबईची मुलगी असून ती लावणीआणि वेस्टर्न डान्समध्ये निपुण आहे. तसंच शास्त्रीय नृत्याची पार्श्वभूमी असलेली मानसी देखील इतर स्पर्धकांसाठी तोडीस तोड ठरेल. श्रुतीने तर तिच्या आईकडूनच लावणीचे धडे घेतले आहेत त्यामुळेतिला टक्कर देणं देखील इतर स्पर्धकांना खूप अवघड जाणार आहे. शिल्पा ही एक्सप्रेशन क्विन आहे आणि तिचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहे. या चार ही अप्सरा आतापर्यंतचा कार्यक्रम पाहूनआल्या आहेत त्यामुळे त्यांना इतर स्पर्धकांचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहिती आहेत तसंच परीक्षकांचा अभिप्राय लक्षात घेऊन या अप्सरा स्वतःच्या नृत्यात सुधारणा करू शकतात आणि हि त्यांना मिळालेली सुवर्णसंधी आहे.
पण वाईल्डकार्ड एंट्रीमुळे होणारं एक नुकसान म्हणजे आधीच्या अस्पारांचा परीक्षकांसोबत एक वेगळाच बॉण्ड आहे तसंच प्रेक्षक देखील त्यांना आधीपासून पाहत आलेआहेत त्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांची ओळख निर्माण करायला या अप्सरांना थोडा वेळ लागेल. पण या अप्सरांमुळे कार्यक्रमाची रंगात अजून वाढेल यात शंकाच नाही. या चार अप्सरांमधून कोण ३ अप्सराया स्पर्धेचा भाग होतील.