Bigg Boss 13 : मस्तमौला दिसणा-या शहनजान गिलने या कारणामुळे केला होता आत्महत्येचा प्रयत्न, कारण वाचून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 01:14 PM2020-01-29T13:14:54+5:302020-01-29T13:19:22+5:30
सगळ्याधिक लोकप्रिय स्पर्धकाच्या यादीत शहनाज आज आघाडीवर आहे. दररोज काही ना काही कारनामे करत ती साऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा ती प्रयत्न करत असते. आज शहनाजचा मोठा फॅनफॉलोइंग आहे.
पंजाबची कॅटरिना म्हणून ओळखली जाणारी शहनाज आज घराघरात लोकप्रिय झाली आहे. 'बिग बॉस 13' मध्ये शहनाजने एंट्री घेतल्यापासून ती रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहे. सगळ्याधिक लोकप्रिय स्पर्धकाच्या यादीत शहनाज आज आघाडीवर आहे. दररोज काही ना काही कारनामे करत ती साऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा ती प्रयत्न करत असते. आज शहनाजचा मोठा फॅनफॉलोइंग आहे.
आज तिला एंटरटेनमेंट क्वीन म्हणूनही संबोधले जाते. ऑनस्क्रीन सा-यांना खळखळून हसवणारी शहनाज मात्र कधी काळी डिप्रेशनमध्येही गेली होती. इतकेच नव्हेतर तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. खुद्द तिच्या वडिलांनीच या गोष्टीचा खुलासा केला आहे. हिमांशी खुरानासह झालेल्या वादामुळे शहनाज डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यावेळी सगळ्याच गोष्टी तिला निर्थक वाटू लागल्या होत्या. आयुष्याला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.
आज बिग बॉसमध्ये तिचा मनमुराद अंदाज , स्वच्छंद जगाणारी शहनाजला पाहून कोणालाच वाटणार नाही की, तिनेही कधी स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न कधी केला असावा. मात्र कुटुंबियांच्या मदतीने शहनाजने सारी दुःख बाजुला सारत पुन्हा एकदा आपले आयुष्य आनंदाने जगण्यास सुरूवात केली आहे. स्वतःचा आनंद आज तिच्या कामाच्या माध्यमातून इतरांनाही ती देत आहे.
सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल बिग बॉसच्या घरात सुरूवातीपासून दिल्लगी करताना दिसत आहेत. त्यात शहनाजचं सिद्धार्थवर प्रेम असल्याचं जगजाहीर झालं आहे. त्यात शोमध्ये कित्येकदा शहनाजने सिद्धार्थवर प्रेम असल्याचे सांगितले आहे. त्या दोघांची केमिस्ट्री रसिकांच्याही खूप पसंतीस पात्र ठरत आहे.