Bigg Boss Marathi 3, Episodes, 2 Nov: टास्क खेळताना मीनल-मीरामध्ये मारामारी; स्पर्धकांचा होणार डब्बा गुल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 13:30 IST2021-11-02T13:30:00+5:302021-11-02T13:30:00+5:30
Bigg Boss Marathi 3: डब्बा गुल या कार्यात दोन्ही टीममधील सदस्यांमध्ये राडे होताना दिसणार आहेत. इतकंच नाही तर मीनल आणि मीरा या दोघींमध्ये पुन्हा जोरदार भांडण होणार आहे.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 2 Nov: टास्क खेळताना मीनल-मीरामध्ये मारामारी; स्पर्धकांचा होणार डब्बा गुल
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) तिसऱ्या पर्वात सध्या प्रत्येक आठवड्यात नवनवीन टास्क रंगताना दिसत आहेत. आता लवकरच या नव्या आठवड्यात स्पर्धकांना एका कठीण टास्कला सामोरं जावं लागणार आहे. काल घरात अनपेक्षिरित्या पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यात गायत्री (gayatri datar) व उत्कर्षने (utkarsh shinde) जयला (jay dudhane) नॉमिनेट केलं आहे. जयसोबतच विशाल निकम(vishal nikam), सोनाली पाटील (sonali patil), तृप्ती देसाई (trupti desai), मीनल शाह (meenal shah) हे या आठवड्यात घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता या सदस्यांमध्ये 'डब्बा गुल' हे कार्य रंगणार आहे.
डब्बा गुल या कार्यात दोन टीम करण्यात येणार असून दरवेळी या दोन्ही टीममधील सदस्यांमध्ये राडे होताना दिसणार आहेत. इतकंच नाही तर मीनल आणि मीरा या दोघींमध्ये पुन्हा जोरदार भांडण होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी दोघीही एकमेकींच्या अंगावर धावून जात मारामारी करणार आहेत.
सोनाली खेळायला येत नाही का असा प्रश्न मीनलने विचारला होता. त्यावर रामायण, महाभारत असं बरंच काही घडायचं आहे, असं उत्तर सोनालीने दिलं होतं. तिने दिलेल्या उत्तराप्रमाणेच या टास्कमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. 'तू धक्काबुक्की का करतेस?' असा प्रश्न मीनलने मीराला विचारला. त्यावर मीरा तिच्या अंगावर धावून जात 'चल निघ..', असं म्हणत तिला लांब ढकलते. त्यामुळे हा वाद वाढताना दिसणार आहे.
दरम्यान, हा टास्क खेळताना स्पर्धकांनी घराला एकप्रकारे कुस्तीचा आखाडाच केला होता. स्पर्धकांमध्ये ओढाताण, पाय खेचणे, धक्काबुक्की, शाब्दिक वार असं सारं काही घडताना दिसत आहे.