Bigg Boss Marathi 3 Episodes, 26 Sep:' तुला बुद्धीचा वापर करता येतच नाही का?; तृप्ती देसाई करणार शिवलिलाची कानउघडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 11:57 AM2021-09-26T11:57:57+5:302021-09-26T12:01:31+5:30

Bigg boss marathi 3: शिवलिला आणि तृप्ती देसाई यांच्यात पडलेली वादाची ठिणगी किती मोठा पेट घेणार हे आजच्या बिग बॉसच्या चावडीवरच पाहायला मिळणार आहे.

bigg boss marathi 3 episodes 26 sep Trupti Desai And Shivleela War Begin | Bigg Boss Marathi 3 Episodes, 26 Sep:' तुला बुद्धीचा वापर करता येतच नाही का?; तृप्ती देसाई करणार शिवलिलाची कानउघडणी

Bigg Boss Marathi 3 Episodes, 26 Sep:' तुला बुद्धीचा वापर करता येतच नाही का?; तृप्ती देसाई करणार शिवलिलाची कानउघडणी

googlenewsNext
ठळक मुद्देशिवलिलानेही केला तृप्ती देसाईंवर पलटवार

छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व सुरु होऊन एक आठवडा उलटून गेला आहे. त्यामुळे घरात आता दररोज नवनवीन टास्क आणि वाद रंगू लागले आहेत. आतापर्यंत या घरात प्रत्येकाचं परस्परांसोबत वाद झाले असून अनेकांनी एकमेकांवर काही आरोप-प्रत्यारोपही केले आहेत. यामध्येच आता शनिवार-रविवारच्या भागात 'बिग बॉसची चावडी' रंगताना दिसत आहे. मात्र, बिग बॉसच्या पहिल्याच चावडीमध्ये महेश मांजरेकरांनी स्पर्धकांची चांगलीच कानउडणी केली आहे. इतकंच नाही तर महेश मांजरेकरांसोबतच तृप्ती देसाईदेखील शिवलीलाची कानउघडणी करताना दिसून येणार आहेत.

शनिवारी (२५ सप्टेंबर) झालेल्या भागात घरातील सदस्यांनी इतरांविषयी वाटत असलेली मत मांडल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता आजच्या भागात महेश मांजरेकर घरातील सदस्यांना आणखी एक नवा टास्क देणार आहेत. यात घरातील स्पर्धकांनी त्यांना खटकलेल्या स्पर्धकाची कानउडणी करायची आहे. यात तृप्ती देसाईंनी शिवलीलावर टीकास्त्र डागलं  आहे. 

"मला शिवलीला हिला एक सांगायचंय, स्वत:च्या बुद्धीचा वापर तुला करताच येत नाही का गं?" असा थेट सवाल तृप्ती देसाई विचारणार आहेत. यावर "मोठ्याने बोललं, किंवा भांडण केलं म्हणजे आपले विचार मांडले असं म्हणता येत नाही", असं प्रत्युत्तर शिवलिला देणार आहे.

'कॉमेडी सर्कस'च्या गंगुबाईने घटवलं २२ किलो वजन; आता दिसते प्रचंड ग्लॅमरस

"इथे कोणी प्रबोधनकार किंवा किर्तनकार आलीये हे तुझ्याकडे पाहिल्यावर वाटतच नाही", असा पुन्हा एक पलटवार तृप्ती देसाई करतात. त्यामुळे शिवलिला आणि तृप्ती देसाई यांच्यात पडलेली वादाची ठिणगी किती मोठा पेट घेणार हे आजच्या बिग बॉसच्या चावडीवरच पाहायला मिळणार आहे.

महेश मांजरेकरांनी घेतली मीराची शाळा

२५ तारखेला झालेल्या बिग बॉसच्या चावडीमध्ये महेश मांजरेकरांनी मीरा जगन्नाथची शाळा घेतली. घरात पाय ठेवल्यापासून तू सतत किरकिर करत आहे. प्रत्येक गोष्टीवर तुला आक्षेप असतो, असं म्हणत त्यांनी तिला सुनावलं आहे. सोबतच जय दुधाणे, विशाल निकम यांचेही चांगलेच कान पिळले आहेत.

यंदाचे १५ स्पर्धक

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये विशाल निकम, उत्कर्ष शिंदे, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, जय दुधाणे, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे यांनी यंदा घरात प्रवेश केला आहे.
 

Web Title: bigg boss marathi 3 episodes 26 sep Trupti Desai And Shivleela War Begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.