Bigg Boss Marathi 3, Episodes, 31 Oct: 'मीराला बाहेर काढा'; उत्कर्षचं वाक्य त्यालाच भोवणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 14:00 IST2021-10-31T14:00:00+5:302021-10-31T14:00:00+5:30
Bigg Boss Marathi 3: आज रंगणाऱ्या चावडीवर एका प्रेक्षकाने मीराकडे उत्कर्षची चुगली केली आहे. त्यामुळे मीरा चांगलीच संतापणार असून ती उत्कर्षला सडेतोड उत्तर देणार आहे.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 31 Oct: 'मीराला बाहेर काढा'; उत्कर्षचं वाक्य त्यालाच भोवणार?
छोट्या पडद्यावरील बिग बॉस (Bigg Boss Marathi 3) हा शो अनेक जण आवडीने पाहतात. मात्र, असेही काही जण आहेत जे खासकरुन शनिवार-रविवार या दोन दिवशी रंगणाऱ्या बिग बॉसच्या चावडीसाठी हा शो पाहतात. बिग बॉसच्या चावडीवर दरवेळी महेश मांजरेकर (mahesh manjarekar) घरातल्यांची शाळा घेत असतात. यावेळीदेखील मांजरेकरांनी विशालची शाळा घेतली. त्याचसोबत आज रंगणाऱ्या चावडीवर एका प्रेक्षकाने मीराकडे (meera jagannath) उत्कर्षची चुगली केली आहे. त्यामुळे मीरा चांगलीच संतापणार असून ती उत्कर्षला (utkarsh shinde) सडेतोड उत्तर देणार आहे.
आज रंगणाऱ्या 'बिग बॉस'च्या चावडीवर स्पर्धकांचे काही चाहते त्यांना घरातल्या व्यक्तींची चुगली सांगणार आहेत. यामध्ये मीराचा एक चाहता तिला उत्कर्षची चुगली सांगणार आहे.
'स्वर्ग आणि नरक' या टास्कमधून मीराला बाहेर काढा', असं उत्कर्ष त्याच्या टीमला म्हणाला होता. हेच आता मीराला समजणार आहे. "स्वर्ग आणि नरक या टास्कमध्ये मीराला टार्गेट करा आणि तिला या टास्कमधून बाहेर काढा असं
उत्कर्षने त्याच्या टीमला सांगितलं. आणि, आता मला माझ्या चाहत्यांवर १०० टक्के विश्वास आहे," असं मीराने चाहत्याची चुगली ऐकल्यावर घरातल्यांना सांगितलं. दरम्यान, चाहत्याने केलेल्या या चुगलीमुळे मीरा चांगलीच संतापली असून ती उत्कर्षला कशा पद्धतीने उत्तर देईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.