Bigg Boss Marathi 3, Episodes, 4 Nov: "एक नंबरची खोटारडी आहे"; मीनलचा तृप्ती देसाईंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 11:38 AM2021-11-04T11:38:34+5:302021-11-04T11:52:21+5:30

 Bigg Boss Marathi 3: मीरा आणि मीनल यांचं कायम कोणा ना कोणासोबत वाद होतच असतात. यावेळी मीनलने थेट तृप्ती देसाईंबरोबर पंगा घेतला आहे.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 4 Nov: "The number one liar"; Meenal accuses Trupti Desai |  Bigg Boss Marathi 3, Episodes, 4 Nov: "एक नंबरची खोटारडी आहे"; मीनलचा तृप्ती देसाईंवर आरोप

 Bigg Boss Marathi 3, Episodes, 4 Nov: "एक नंबरची खोटारडी आहे"; मीनलचा तृप्ती देसाईंवर आरोप

बिग बॉस मराठीचं (bigg boss marathi) तिसरं पर्व विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. यात प्रत्येक टास्कच्या दरम्यान घरातील सदस्यांची एकमेकांसोबत कडाक्याची भांडण होताना पाहायला मिळतात. त्यात मीरा आणि मीनल यांचं तर कायम कोणा ना कोणासोबत वाद होतच असतात. यावेळी मीनलने (meenal) थेट तृप्ती देसाईंबरोबर (trupti desai) पंगा घेतला आहे. या दोघींमध्ये मोठा शाब्दिक वाद झाला असून मीनलने तृप्ती देसाईंवर खोटारडेपणाचा आरोप केला आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये तृप्ती देसाई व मीनल एकमेकींसोबत भांडण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे तृप्ती देसाई विकासजवळ गॉसिपिंग करत असताना मीनलच्या निदर्शनास आल्यामुळे तिचा संतापाचा पारा चढल्याचं दिसून आलं.

Video: दादूसच्या साथीने तृप्ती देसाईंनी केला कोळी गाण्यावर डान्स

बिग बॉसच्या घरात सुरु असलेल्या साप्ताहिक कार्यात पुरुष स्पर्धकांनी धक्काबुक्की केल्यामुळे बिग बॉसने विशाल, विकास, जय आणि उत्कर्ष यांना कार्यामधून बाद केलं. त्यामुळे अर्ध्या सदस्यांसोबत हे कार्य पुढे कसं जाणार हा प्रश्न घरातील सदस्यांना पडला आहे. यावर चर्चा करत असताना तृप्ती देसाई विकासकडे मीनलची चुगली करत होत्या.

'मीनल एकदम चिटिंग करते', असं तृप्ती देसाई म्हणाल्या. त्यावर 'ती एक नंबरची खोटारडी आहे. असा थर्ड क्लास गेम मी कधी आयुष्यात खेळणार नाही', असं मीनल म्हणाली. त्यावर 'थर्ड क्लास गेम कोण खेळत आहे ते कळत आहे इथे', असा पलटवार तृप्ती देसाईंनी केला.

दरम्यान, मीनलने या वादात संचालक असं करत का ? असा जाब विचारला आहे. सोबतच “तुम्हाला काय हवं आहे मी गेम सोडू इकडे?”असा प्रश्नही ती तृप्ती देसाईंना विचारते. त्यामुळे आता या दोघींमधील वाद कुठवर जातो हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 3, Episodes, 4 Nov: "The number one liar"; Meenal accuses Trupti Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.