Bigg Boss Marathi 4 : किती लोकांना हे दाखवून फसवणार? किरण मानेंचा ‘तो’ व्हिडीओ पाहून संतापले फॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 05:19 PM2023-01-04T17:19:34+5:302023-01-04T17:20:04+5:30

Bigg Boss Marathi 4 : येत्या 8 जानेवारीला ‘बिग बॉस मराठी 4’चा ग्रँड फिनाले रंगणार आहे. अशात सध्या बिग बॉसच्या दोन सदस्यांची चर्चा जोरात आहे. हे दोन सदस्य कोण तर राखी सावंत आणि किरण माने...

Bigg Boss Marathi 4 Kiran Mane Rakhi Sawant Video Get Troll | Bigg Boss Marathi 4 : किती लोकांना हे दाखवून फसवणार? किरण मानेंचा ‘तो’ व्हिडीओ पाहून संतापले फॅन्स

Bigg Boss Marathi 4 : किती लोकांना हे दाखवून फसवणार? किरण मानेंचा ‘तो’ व्हिडीओ पाहून संतापले फॅन्स

googlenewsNext

बिग बॉस मराठी 4’चा (Bigg Boss Marathi 4) ग्रँड फिनाले आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 8 जानेवारीला ‘बिग बॉस मराठी 4’चा ग्रँड फिनाले रंगणार आहे. अशात सध्या बिग बॉसच्या दोन सदस्यांची सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. हे दोन सदस्य कोण तर राखी सावंत ( Rakhi Sawant) आणि किरण माने (Kiran Mane). होय, राखी व किरण मानेंचं नवं ‘प्रेम’ घरात फुलताना दिसत आहे. अर्थात हे सगळं प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी असलं तरी प्रेक्षक मात्र हे पाहून कंटाळले आहेत. परिणाम काय? तर बिग बॉस मराठी हा शो सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होत आहेत. 

किरण माने आणि राखी सावंतचा बिग बॉस मराठीच्या घरातील व्हिडीओ व्हायरल होत आहे.  या व्हिडीओत किरण माने हे लाल रंगाच्या नेलपेंटने बदाम काढत राखीचं नाव लिहिताना दिसत आहेत. किरण माने लाल नेलपेंटने एका प्लेटवर आरके लिहितात. सोबत हार्ट काढतात.  त्यावेळी अपूर्वा त्यांची मस्करी करते. काय? प्रिय राखी असं लिहिताय का? असं ती विचारते. यावर, हे मी आरके लिहितोय. खरंतर ते आरएम असं हवंय म्हणजे राखी माने असं होईल, असं माने म्हणतात.  


किरण मानेंचा हा व्हिडीओ समोर आला आणि तुफान व्हायरल झाला. अनेकांनी मात्र हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला. ‘सगळं तुम्ही फक्त टीआरपीसाठी करताय, लोकांच्या हुनरला इथं किंमत नाहीये. फक्त तुम्हाला तुमच्या मनाचे लोक पुढ घेऊन जायचेत . ते  वोटींग बंद करा पहिल, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

निव्वळ मूर्खपणा... बंद करा रे हा फालतू पणा अजून किती लोकांना हे दाखवून फसवणार? अशी संतप्त प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. एकंदर काय तर किरण माने व राखी सावंत ‘फेक’ प्रेम पाहून प्रेक्षक वैतागले आहेत. आता पुढे काय होतं, ते बघूच.
  

Web Title: Bigg Boss Marathi 4 Kiran Mane Rakhi Sawant Video Get Troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.