Bigg Boss Marathi: 'मी एकटी जरी असले तरी...'; जयला स्नेहाने दिलं ठामपणे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 01:49 PM2021-10-25T13:49:35+5:302021-10-25T13:50:08+5:30

Bigg boss marathi: यंदाच्या पर्वात जय दुधाणे आणि स्नेहा वाघ ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे. बऱ्याचदा हे दोघं घरात एकमेकांसोबत गप्पा मारतांना, मस्ती करताना दिसतात.

Bigg Boss Marathi: 'Even if I'm alone ...'; Jaya lovingly replied emphatically | Bigg Boss Marathi: 'मी एकटी जरी असले तरी...'; जयला स्नेहाने दिलं ठामपणे उत्तर

Bigg Boss Marathi: 'मी एकटी जरी असले तरी...'; जयला स्नेहाने दिलं ठामपणे उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देयंदाच्या पर्वातील लव्हबर्ड्स असल्याची टीकाही अनेकांनी त्यांच्यावर केली आहे

 बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) यंदाच्या पर्वात जय दुधाणे (jay dudhane) आणि स्नेहा वाघ (sneha wagh)ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे. बऱ्याचदा हे दोघं घरात एकमेकांसोबत गप्पा मारतांना, मस्ती करताना दिसतात. त्यामुळे या दोघांमध्ये खास नातं निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं. इतकंच नाही तर यंदाच्या पर्वातील हे लव्हबर्ड्स असल्याची टीकाही अनेकांनी त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे ही जोडी सातत्याने चर्चेत येत असते. सध्या सोशल मीडियावर या दोघांमधील एक संभाषण चर्चेत येत आहे. यामध्ये स्नेहा ठामपणे तिचं मत मांडताना दिसते. 'मी एकटी असले तरी पुरेशी आहे', असं तिने जयला सांगितलं आहे.

जय आणि स्नेहा यांच्यामध्ये सोनालीविषयी (sonali patil) चर्चा सुरु आहे. सोनाली प्रत्येक गेममध्ये मागे असते हे जय स्नेहाला सांगताना दिसत आहे.  "सोनाली जरी विरुद्ध टीममध्ये असली तरीदेखील माझ्यासोबत खेळ असं मी तिला कधीच सांगत नाही. फक्त तू खेळताना दिसत नाही. टीममध्ये किंवा टास्कमध्ये मागे असल्याचं दिसून येतं हेच सांगायचा प्रयत्न करतो. स्वत:वर विश्वास असणं गरजेचं आहे. मी उत्कर्षला कायम सांगतो आपण दोघं जरी असलो तरी सगळ्यांसाठी पुरेसे आहोत. त्यामुळे आपल्यासोबत चार जण पाहिजेत हा विचारच नाही करायचा", असं जय म्हणतो. 

जयचं म्हणणं ऐकल्यावर स्नेहा तिचं मत मांडते.  "मी सुद्धा तसाच विचार करते. मी एकटी जरी असले तरी भरपूर आहे", असं स्नेहा म्हणते. त्यावर "मला तुझ्या टीममध्ये घे. तुझ्यासोबत मलाही काऊंट करत जा. मी घेना तुझ्या टीममध्ये", असं जय स्नेहाला म्हणतो.

दरम्यान, जयचं वागणं पाहून तो खरंच स्नेहाच्या प्रेमात पडलाय का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडल्याचं पाहायला मिळतं. आता स्नेहा आणि जय खरंच एक नवा ग्रुप करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
 

Web Title: Bigg Boss Marathi: 'Even if I'm alone ...'; Jaya lovingly replied emphatically

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.