मनालीच्या भीषण पूरात 'बालिका वधू' फेम अभिनेता अडकला, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 11:13 AM2023-07-11T11:13:58+5:302023-07-11T11:16:22+5:30

"रस्ते बंद असल्यामुळे...", मनालीच्या पूरात अडकलेल्या टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

himachal pradesh rain balika vadhu fame actor Ruslaan Mumtaz get stuck in flood | मनालीच्या भीषण पूरात 'बालिका वधू' फेम अभिनेता अडकला, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

मनालीच्या भीषण पूरात 'बालिका वधू' फेम अभिनेता अडकला, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

googlenewsNext

उत्तर भारतात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशातही पावसाने थैमान घातलं आहे. पावसाचं भयावह रुप दाखवणारे तेथील अनेक व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हिमाचल प्रदेशात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मनालीत  प्रसिद्ध अभिनेता अडकून पडला आहे. 

टीव्ही अभिनेता रुस्लान मुमताज याचं मनालीत शूटिंग सुरू होतं. परंतु, मनालीत पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे तो तिथेच अडकून पडला आहे. रुस्लानने मनालीतील काही व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये मनाली आणि चंदिगढ दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेल्याचं दिसत आहे. 

"माझ्या पाठीमागे दिसणारा हा रस्ता आता अस्तित्वात नाही," असं त्याने स्टोरीमध्ये म्हटलं आहे. रुस्लान व त्याच्याबरोबर इतर काही जणांनी एका छोट्या जागेत आसरा घेतल्याचंही त्याने सांगितलं आहे. फोटो शेअर करत "आजच्या रात्रासाठी घर" असं त्याने स्टोरीत म्हटलं आहे. "मनालीत मी अशा पद्धतीने अडकून पडेल, असा कधी विचारही केला नव्हता. रस्ते बंद असल्यामुळे मी घरीही जाऊ शकत नाही. आमचं शूटिंगही बंद आहे. मनालीसारख्या सुंदर जागेसाठी हा कठीण काळ आहे," असं रुस्लानने व्हिडिओत म्हटलं आहे. 

रुस्लानने 'बालिका वधू', 'लाल इश्क', 'एमटीव्ही बिग एफ' यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. याशिवाय तो चित्रपट व वेब सीरिजमध्येही झळकला आहे. 

Web Title: himachal pradesh rain balika vadhu fame actor Ruslaan Mumtaz get stuck in flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.