धक्कादायक! 'टॅलेंटपेक्षा गरीबीला देतात जास्त महत्त्व', 'इंडियन आयडॉल'च्या निर्मात्यांवर भडकला अभिजीत सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 01:58 PM2021-05-20T13:58:48+5:302021-05-20T14:00:51+5:30
इंडियन आयडॉल (Indian Idol) हा रिअॅलिटी शो गेल्या काही वर्षांपासून बर्याच वादात अडकला आहे.
इंडियन आयडॉल (Indian Idol) गेल्या काही वर्षांपासून बर्याच वादात आहे. प्रत्येक सीझनमध्ये या रिअॅलिटी शोबद्दल काही ना काही वाद उद्भवतो. यावर्षी 'इंडियन आयडल 12' (Indian Idol 12) संबंधित अनेक विवाद झालेत. या सीझनमधील सवाई भट्ट Sawai Bhatt) च्या गरीब परिस्थितीपासून ते शोमधील किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्या गाण्यापर्यंत अनेक गोष्टींना घेऊन या सीझनला ट्रोल झाला आहे.
अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) 'इंडियन आयडल'च्या पहिल्या सीजनचा विजेता आहे. अभिजीत म्हणाला, सध्या रिअॅलिटी शो निर्माते टॅलेंट पेक्षा जास्त या गोष्टीवर लक्ष देतात की त्याला बूट पॉलिश करतायेतात की तो किती गरीब आहे. 'इंडियन आयडॉलच 11' सीझन सनी हिंदुस्तानीने जिंकला होता. वयाच्या 13 व्या वर्षी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यानंतर सनीने कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी बूट पॉलिशचे काम करायचा.
गायक अभिजीत सावंतने 'आज तक'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,' जर तुम्ही प्रादेशिक रिअॅलिटी शो बघला तर प्रेक्षकांना स्पर्धकांच्या बँकग्राऊंडबाबत कदाचित काहीच माहिती नसते. तिथले लोक फक्त गाण्यावरच लक्ष केंद्रित करतात, पण हिंदी रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांच्या दुःखद कहाण्यांची पूर्तता केली जाते. केवळ त्याच्यावरच लक्ष केंद्रित केले आहे.
काही दिवसांपूर्वी अभिजीतने इतका छान आवाज असताना त्याला बॉलिवूडमध्ये संधी का मिळाली नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना अभिजीत सावंतने बॉलिवूडचे धक्कादायक वास्तव सांगितले होते. मुलाखतीत अभिजीत सावंतने त्याच्या करिअरबद्दल सांगितले. तो म्हणाला, “आपली इंडस्ट्री टॅलेंटवर कमी आणि ओळखींवर जास्त काम करते. बहुतांश संगीतकार आपल्या ओळखीच्या गायकांनाच संधी देतात. त्यांचा एक गट असतो अन् त्या गटामध्ये पोहोचणे बाहेरील गायकांसाठी खुप कठीण असतं. माझ्या बाबतीतही तेच घडले.