'तारक मेहता का उल्टा चष्मा'वर 'जेठालाल' दिलीप जोशी नाराज, म्हणाला - क्वालिटी घसरली...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 03:48 PM2020-11-03T15:48:02+5:302020-11-03T15:50:13+5:30
अभिनेता दिलीप जोशीला वाटतं की, वेळेनुसार शोच्या रायटिंगवर फार वाईट प्रभाव पडला आहे आणि जास्त एपिसोड टेलिकास्ट करण्याच्या नादात आता ही एक फॅक्टरी झाली आहे.
गेल्या काही एपिसोडपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेचा टीआरपी सतत कमी होत आहे आणि आता तर कधीकाळी टॉपला राहणारा हा शो टॉप ५ मधूनही बाहेर गेला आहे. यावर अभिनेता दिलीप जोशीला वाटतं की, वेळेनुसार शोच्या रायटिंगवर फार वाईट प्रभाव पडला आहे आणि जास्त एपिसोड टेलिकास्ट करण्याच्या नादात आता ही एक फॅक्टरी झाली आहे.
स्टॅंड-अप कॉमेडिअन सौरभ पंतसोबत बोलताना दिलीप जोशी म्हणाला की, 'जेव्हा तुम्ही कॉन्टिटी बघता तेव्हा कुठे ना कुठे क्वालिटी प्रभावित होतेच. आधी आम्ही शो आठवड्यातून एक दिवस करत होतो आणि रायटर्सकडे बराच वेळ राहत होता. चार एपिसोड लिहिले की, दुसरे चार एपिसोड पुढील महिन्यात शूट करायचे होते'. (SEE PICS : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’तील अय्यरला ख-या आयुष्यात मिळणार ‘बबीता’)
'अनेक एपिसोड कॉमेडीच्या लेव्हलचे नाही'
जेठालालची भूमिका साकारणारा अभिनेता दिलीप जोशी म्हणाला की, 'आता रोज रायटर्सना नवा विषय शोधावा लागतो. अखेर ते सुद्धा माणसं आहेत. मला असं वाटतं की, जेव्हा तुम्ही असा शो रोज करत आहात तर सर्वच एपिसोड एकाच लेव्हलचे होऊ शकत नाहीत. कॉमेडीबाबत म्हणाल तर काही एपिसोड्स आहेत जे त्या लेव्हलचे नाही'. ('तारक मेहता'मध्ये नवीन ट्विस्ट, गोकुळधाम सोसायटीतून पोपटलाल झाला बेपत्ता)
दिलीप जोशीला दु:खं वाटतं की, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका आता एक फॅक्टरी झाली आहे. ज्यात रायटर्सना रोज एपिसोड लिहावे लागतात आणि नवे विषय शोधावे लागतात'.