The Kapil Sharma Show: चंदू चायवाला आहे कोटयवधींचा मालक; संपत्ती ऐकून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 13:38 IST2021-09-15T13:31:45+5:302021-09-15T13:38:27+5:30
The Kapil Sharma Show : कार्यक्रमात एका चहावाल्याची भूमिका साकारणारा हा अभिनेता कोटयवधींचा मालक असून त्याच्या एकूण मालमत्तेविषयी जाणून घेण्याची कायमच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते.

The Kapil Sharma Show: चंदू चायवाला आहे कोटयवधींचा मालक; संपत्ती ऐकून व्हाल थक्क
गेल्या कित्येक वर्षांपासून 'द कपिल शर्मा शो' हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे कायमच हा शो चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. या शोमधील प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. म्हणूनच या शोमधील प्रत्येक कालाकाराचा एक स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच या शोमध्ये चंदू चायवाला ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेता चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. कार्यक्रमात एका चहावाल्याची भूमिका साकारणारा हा अभिनेता कोटयवधींचा मालक असून त्याच्या एकूण मालमत्तेविषयी जाणून घेण्याची कायमच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते.
'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ३'चा पहिला रनर अप ठरलेल्या चंदन प्रभाकरने आतापर्यंत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. मात्र, यशाचं शिखर सर करणाऱ्या या अभिनेत्याला सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करावा लागला होता. परंतु, अनेक संकटांवर मात करत चंदन प्रभाकरने कलाविश्वात स्वत:चं हक्काचं एक स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे शून्यातून विश्व उभं करणारा चंदन आज जवळपास १५ कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे.
रणवीरच्या बहिणीपुढे 'मस्तानी'ही फेल; पाहा दीपिकाच्या नणंदेचे ग्लॅमरस फोटो
चंदन प्रभाकरकडे आहे अमाप संपत्ती
चंदनला गाड्यांची विशेष आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक गाड्यांचं कलेक्शन आहे. यात BMW 3 Series 320D यांसारख्या गाड्यांचाही समावेश आहे. चंदन एका एपिसोडसाठी ५ते ७ लाख रुपये मानधन घेतो असं म्हटलं जातं.
चित्रपटांमध्येही झळकलाय चंदन
छोट्या पडद्याप्रमाणेच चंदन काही चित्रपटांमध्येही झळकला आहे. यात 'भावनाओं को समझो', 'पावर कट', 'डिस्को सिंग' आणि 'जज सिंह एलएलबी' या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.