या प्रसिद्ध कॉमेडियनला लागले होते हे व्यसन, अशाप्रकारे केली त्यावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 17:54 IST2019-07-24T16:43:24+5:302019-07-24T17:54:30+5:30
सुमोनाला गेल्या अनेक वर्षांपासून एक व्यसन होते. पण आता ती या व्यसनापासून पूर्णपणे दूर गेली असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.

या प्रसिद्ध कॉमेडियनला लागले होते हे व्यसन, अशाप्रकारे केली त्यावर मात
सुमोना चक्रवर्तीने मन या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने अभिनयातून काही वर्षांचा ब्रेक घेतला आणि तिने बर्फी, किक, फिर से यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कसम से, बडे अच्छे लगते है, जमाई राजा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली असली तरी तिला खरी लोकप्रियता कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे मिळाली. या कार्यक्रमात ती कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. सध्या ती द कपिल शर्मा या कार्यक्रमात देखील कपिल शर्मासोबत महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे.
सुमोनाला गेल्या अनेक वर्षांपासून एक वाईट सवय होती. पण आता ती वाईट सवय तिने सोडली असल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. ती स्मोकिंगच्या पूर्ण अधीन गेली होती, पण तिने दोन वर्षांपूर्वी सिगरेट पिणे पूर्णपणे कशाप्रकारे सोडले याचा उल्लेख तिने इन्स्टाग्रामवरील एका पोस्टद्वारे केला आहे.
तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, दोन वर्षांपूर्वी... माझ्या एका लाडक्या मित्राच्या वाढदिवसानंतर मी स्मोकिंग पूर्णपणे सोडले. त्यानंतर आजतागायत मी सिगरेटला हात देखील लावलेला नाहीये. खरे तर स्मोकिंग सोडणे माझ्यासाठी खूपच कठीण होते. पण ते मी करून दाखवले. आता तर माझ्यासमोर कोणी स्मोक करत असेल तरी देखील मी उभी राहू शकत नाही. कोणतीही गोष्ट सोडणे कठीण असते. पण ती एकदा सोडली की त्याचे फायदे कळतात. मी हे सगळे का शेअर करत आहे तर मी एक अभिनेत्री असल्याने मला लोक मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. लोक कलाकारांवर प्रेम करतात, त्यांच्या सगळ्या गोष्टी आत्मसात करतात. त्यामुळे माझ्या या अनुभवामुळे काही लोक तरी प्रेरणा घेतील असे मला वाटते.
सुमोना चक्रवर्तीला सार्वजनिक ठिकाणी देखील अनेकवेळा स्मोक करताना पाहाण्यात आले होते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते.