KBC : खेळासंबंधी पहिल्याच प्रश्नावर अडकला स्पर्धक, घ्यावी लागली लाइफलाईन....
By अमित इंगोले | Published: November 3, 2020 09:39 AM2020-11-03T09:39:57+5:302020-11-03T09:40:40+5:30
KBC 12 : खेळाची सुरूवात दमदार होणार असं चित्र होतं. पण अमिताभ बच्चन पहिल्याच प्रश्नावर हैराण झाले कारण सौरभ यांनी पहिल्याच प्रश्नावर लाइफलाईन घेतली. चला जाणून घेऊ खेळासंबंधी काय होता प्रश्न...
'कौन बनेगा करोडपती'च्या १२वा सीझन सुरू आहे. अनेक स्पर्धक कोरोना काळात मोठी रक्कम जिंकण्याची अपेक्षा ठेवून या शोमध्ये येतात. नुकतेच या शोमध्ये बदायू येथून सौरभ साहू आले होते. सौरभ यांचं अमिताभ बच्चन यांनीही आनंदाने स्वागत केलं होतं. खेळाची सुरूवात दमदार होणार असं चित्र होतं. पण अमिताभ बच्चन पहिल्याच प्रश्नावर हैराण झाले कारण सौरभ यांनी पहिल्याच प्रश्नावर लाइफलाईन घेतली. चला जाणून घेऊ खेळासंबंधी काय होता प्रश्न...
एपिसोडचा पहिलाच प्रश्न पारंपारिक खेळावर आधारित होता. हा खेळ बालपणी प्रत्येक व्यक्ती खेळला असेल किंवा या खेळाचं नाव तर नक्की ऐकलं असेल. पण सौरभ साहू यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. ते कन्फ्यूज झाले होते. आणि त्यांनी पहिल्या प्रश्नासाठी लाइफलाईन घेतली. (KBC : खेळासंबंधी प्रश्नावर स्पर्धकाने वापरल्या दोन लाइफलाईन, तुम्हाला माहीत आहे का उत्तर?)
काय होता प्रश्न?
यातील कोणत्या पारंपारिक खेळासाठी बॉलचा वापर वापर होतो? पर्याय होते - भोवरा, लपाछपी, गोट्या आणि लगोरी. सौरभ पर्याय ए आणि डी मध्ये कन्फ्यूज होते. याच कन्फ्यूजनमुळे त्यांना लाइफलाईन घ्यावी लागली. त्यांनी ५०-५० लाइफलाईन घेतली. मुळात या प्रश्नाचं उत्तर लगोरी असं होतं. हा खेळ खेळण्यासाठी बॉलचा वापर केला जातो. हा खेळ लगोरीसोबतच सतोलिया, सात पत्थर, डिकोरी, लिंगोचा, डब्बा काली सारख्या नावांनीही ओळखला जातो. गावातील लहान मुलांमध्ये हा खेळ अधिक लोकप्रिय आहे. (KBC: १२ लाख ५० हजारांच्या प्रश्नावर क्विट केला खेळ, काय होतं उत्तर तुम्ही करा गेस....)
आईसाठी घर घ्यायचं होतं
सौरभ साहू हे त्यांचे लहान भाऊ गौरव साहूसोबत आले होते. ते बदायूंहून आले होते. ते या खेळात रक्कम जिंकून आईसाठी घर घेणार होते. सौरभला भलेही पहिल्या प्रश्नासाठी लाइफलाईन घ्यावी लागली, पण ते चांगला खेळ खेळत होते. त्यांनी पुढे चांगला खेळ खेळत १२ लाख ५० हजार रूपये जिंकले. हे करत असताना त्यांनी चारही लाइफलाईनचा वापर केला.